मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Mega block today : मुंबईत आज लोकलचा मेगाब्लॉक; घरा बाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Railway Mega block today : मुंबईत आज लोकलचा मेगाब्लॉक; घरा बाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

Mar 12, 2023, 07:28 AM IST

    • Mumbai Local Train Mega block News : नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेनं आज रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पाडण्याचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.
Mumbai Local Train Mega block News (HT_PRINT)

Mumbai Local Train Mega block News : नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेनं आज रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पाडण्याचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

    • Mumbai Local Train Mega block News : नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेनं आज रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पाडण्याचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

Mumbai Local Train Mega block News : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज रविवारी १२ मार्च रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकच्या कालावधीत लोकल गाड्या बंद राहणार आहेत.यामुळे काही काळ मुंबईकरांच गैरसोय होणार असल्याने घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहून आजच्या दिवसाचे नियोजन करावे लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

ब्लॉकच्या वेळेत अशी असेल मध्य रेल्वेची वाहतूक

  • मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढं या गाड्या पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरानं पोहोचतील.
  • ठाण्याहून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेच्या दरम्यान सुटणाऱ्या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. या गाड्या १५ मिनिटं उशिरानं नियोजित स्थळी पोहोचतील. 

धक्कादायक.. मुंबईत बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रिक्षावर पडला, मायलेकीचा मृत्यू

ब्लॉकच्या वेळेत अशी राहील हार्बर मार्गावरील वाहतूक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या काळात मेगाब्लॉक राहील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत पनवेलच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि वांद्रे/गोरेगावहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान सुटणाऱ्या लोकल गाड्या बंद राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
  • ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतरानं चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा