मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन, मात्र यंदा ‘हे’ प्रथमच घडलं..

Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन, मात्र यंदा ‘हे’ प्रथमच घडलं..

Sep 09, 2022, 10:52 PM IST

    • Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचबरोबर मानाच्या पाचही गणपतींचे (Pune Ganeshotsav 2022) परंपरेनुसार विसर्जन पार पडले. पाचव्या मानाच्या गणपतीचे विसर्जन ८ वाजून ५० मिनिटांनी झाले.
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

Pune GaneshVisarjan 2022 : पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचबरोबरमानाच्या पाचही गणपतींचे (Pune Ganeshotsav 2022)परंपरेनुसार विसर्जन पार पडले. पाचव्या मानाच्या गणपतीचे विसर्जन ८ वाजून ५० मिनिटांनी झाले.

    • Pune Ganesh Visarjan 2022 : पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचबरोबर मानाच्या पाचही गणपतींचे (Pune Ganeshotsav 2022) परंपरेनुसार विसर्जन पार पडले. पाचव्या मानाच्या गणपतीचे विसर्जन ८ वाजून ५० मिनिटांनी झाले.

पुणे-पुण्यातील गणेशोत्सव विर्सजन मिरवणूक हीपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी विसर्जन मिरवणूक समजली जाते. त्यातच पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी असते. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मंडई परिसरातून मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला सुरूवात झाली.पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले आहे. त्याचबरोबर मानाच्या पाचही गणपतींचे  (Pune Ganeshotsav 2022)परंपरेनुसार विसर्जन पार पडले.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

डेक्कन येथील महापालिकेच्या हौदामध्ये या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे मानाच्या पाचव्य गणपतीचे विसर्जन करण्याआधीच अन्य दोन मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीत यंदा वेगळे चित्र

विसर्जन मिरवणुकीत यावर्षी प्रथमच वेगळे चित्र पाहायला मिळाले. पुण्यातील प्रथेप्रमाणे पहिल्यांदा पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन होते त्यानंतरच अन्य मंडळांच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र यावर्षी चौथ्या मानाच्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पाचव्या मानाच्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. परंतु केसरीवाडा गणपती अलका चौकात येण्यास उशीर झाल्याने केळकर रस्त्यावरून आलेल्या इतर मंडळांना मार्ग मोकळा करून दिला गेला. महापालिकेचा गणपती आणि अनंत गणेश मंडळ या दोन मंडळांच्या गणपतीचे विसर्जन केसरीवाडा गणपतीच्या आधी झाले आहे. मानाच्या गणपतींच्या विसर्जनास आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यात म्हटले होते की, मानाच्या गणपतींना विसर्जनास प्राधान्य न देता क्रमानुसार येणाऱ्या गणपतींना संधी द्यावी. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत पुण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं सायंकाळी ४.१५ मिनिटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी साडे पाच वाजता झाले. मानाच्या तिसऱ्या गणपतीचे म्हणजे गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन रात्री ७ वाजून २२ मिनिटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन रात्री ८.०२ वाजता झालं.

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन रात्री ८.५० वाजता झालं. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले.

गणेश मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथके, बँड पथके, जनजागृतीचे रथ, कला पथकेसामील झाल्याने मिरवणूक कालावधी लांबण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजराहोत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा