मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Visarjan : आवाज वाढीव डीजे.. सोलापुरात डॉल्बीवरून कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने

Ganesh Visarjan : आवाज वाढीव डीजे.. सोलापुरात डॉल्बीवरून कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने

Sep 09, 2022, 04:49 PM IST

    • डॉल्बीच्या आवाज मर्यादेवरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू झाला. इतर जयंती उत्सवाला डॉल्बीला परवानगी मिळते तर गणेश विसर्जनाला का नाही, असा सवाल उपस्थित करत गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांसोबत वाद घालू लागले.
डॉल्बीवरून कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने

डॉल्बीच्या आवाज मर्यादेवरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू झाला. इतर जयंती उत्सवाला डॉल्बीला परवानगी मिळते तर गणेश विसर्जनाला का नाही,असा सवाल उपस्थित करत गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांसोबत वादघालू लागले.

    • डॉल्बीच्या आवाज मर्यादेवरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू झाला. इतर जयंती उत्सवाला डॉल्बीला परवानगी मिळते तर गणेश विसर्जनाला का नाही, असा सवाल उपस्थित करत गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांसोबत वाद घालू लागले.

सोलापूर –गेल्या ११ दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषी वातावरणात व उत्साहान गणेश उत्सव पार पडत आहे. गणेश उत्सवाचा आज शेवटचा दिवस असून दोन वर्षाच्या खंडानंतर आज राज्यभर भव्य विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. राज्य सरकारनेही जवळपास सर्व निर्बंध उठवले असले तरी डॉल्बी व डीजेची आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र यावरून मंडळाचे कार्यकर्ते व पोलिसांच्या बाचाबाचीचे प्रकार होतात. अशीच घटना सोलापुरात घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्रशासनेने घालून दिलेल्या मर्यादेतच डॉल्बी वाजवा अशा सक्त सूचना पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत. पण गणेश मंडळाने सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली. यावरून नाराज झालेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील लष्कर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मिरवणूक थांबवली अन् रस्त्यावरच धरणे दिले. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे होते की, इतर जयंती, उत्सवाला दोन बेस आणि दोन डॉल्बी वाजवण्याची परवानगी आहे तर आम्हाला का नाही? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मिरवणूक मार्गस्थ केली.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील लष्कर परिसरातील जगदंबा चौकात मध्यवर्ती गणेश मंडळ आहे. अनंत चतुर्थी निमित्ताने मध्यवर्ती गणेश मंडळाने लष्कर येथून भव्य मिरवणुकीची सुरुवात केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सुरू होताच पोलिसांनी डॉल्बी वाजवण्यावरून हस्तक्षेप केला. दोन बेस आणि दोन टॉप वाजवण्यास परवानगी नाही,अशा सक्त सूचना केल्या. यावरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू झाला. इतर जयंती उत्सवाला डॉल्बीला परवानगी मिळते तर गणेश विसर्जनाला का नाही,असा सवाल उपस्थित करत गणेश मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांसोबत वादघालू लागले. यावेळी पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्याआदेशाचा दाखला दिला.

त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचठिय्या आंदोलन सुरू केले.पोलिसांनी सांगितले की, आंदोलन बंद करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नका. त्यानंतर काही वेळाने वातावरण निवळले व मिरवणूक मार्गस्थ झाली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या