मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत शिवसेना-भाजप युती! आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील साथ-साथ

Pune: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत शिवसेना-भाजप युती! आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील साथ-साथ

Sep 09, 2022, 06:45 PM IST

    • Pune Ganesh Festival visarjan Miravnuk : पुण्यात आज जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर आज हा वैभवी सोहळा पुणेकर अनुभवणार आहेत. या सोबत राजकीय मंडळीही बाप्पाच्या दर्शनाठी पुण्यात आली आहेत. कट्टर विरोधक असलेले भाजपचे चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज मतभेद विसरून पुण्यात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे - चंद्रकांत पाटील

Pune Ganesh Festival visarjan Miravnuk : पुण्यात आज जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर आज हा वैभवी सोहळा पुणेकर अनुभवणार आहेत. या सोबत राजकीय मंडळीही बाप्पाच्या दर्शनाठी पुण्यात आली आहेत. कट्टर विरोधक असलेले भाजपचे चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज मतभेद विसरून पुण्यात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

    • Pune Ganesh Festival visarjan Miravnuk : पुण्यात आज जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर आज हा वैभवी सोहळा पुणेकर अनुभवणार आहेत. या सोबत राजकीय मंडळीही बाप्पाच्या दर्शनाठी पुण्यात आली आहेत. कट्टर विरोधक असलेले भाजपचे चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज मतभेद विसरून पुण्यात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

पुणे : कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी पुण्यात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याची आज सांगता होणार आहे. मोठ्या प्रमाणात पुणेकर आज हा सोहळा पाण्यासाठी शहरात जमले आहे. सामान्य नगरिकांसोबत आज नेतेमंडळीही बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. विरोधी पक्ष नेते अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे हे गणरायाच्या दर्शनासाठी पुण्यात आले होते एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना पुण्यात आज काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

भर गर्दीतून दगडूशेठच्या दर्शनसाठी आदित्य ठाकरे आले असता त्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन ये असे सांगितले

शिवसेना नेते आदित्य ठाकरे पुण्यात असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली. दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटीलदेखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. या नंतर पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती, तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले.

यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. यावेळी चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आल्यावर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. एकीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक संधीही न सोडणारे दोन्ही विरोधक सर्व मतभेद विसरून एकमेकांशी गप्पा मारत होते.

 

पुढील बातम्या