मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या ३ पोलिसांवर गुन्हा

Pune Crime : पुण्यात एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या ३ पोलिसांवर गुन्हा

Nov 22, 2022, 01:59 PM IST

    • Pune Crime : पुण्यात एका मोठ्या हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.
Pune crime (HT_PRINT)

Pune Crime : पुण्यात एका मोठ्या हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.

    • Pune Crime : पुण्यात एका मोठ्या हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.

पुणे : पुण्यात समाजाचे रक्षक असलेले पोलीसच भक्षक असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. मुंढव्यातील हॉटेल मेट्रोमध्ये दारूच्या नशेत जात तीन पोलिसांनी आणखी दारूची मागणी घालत धिंगाणा घातला तसेच तेथील कर्मचाऱ्याला देखील त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

Pune :नवीन मोटार घेतल्यानंतर दर्शन घेऊन निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; लोणीकंद- थेऊर रस्त्यावर ट्रक मोटारीचा भीषण अपघात

उमेश मरीस्वामी मठपती (वय २९, पोलिस अमंलदार, रा. सदानंद नगर, सोमवार पेठ), अमित सुरेश जाधव( (वय ३७, पोलिस अंमलदार, रा. भवानी पेठ, पोलिस लाईन) आणि योगेश भगवान गायकवाड ( वय ३२, पोलिस अंमलदार, रा. मातोश्री बिल्डींग, गणपती मंदिर समोर, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यासंदर्भात कुनाल दशरथ मद्रे (वय २७, धंदा – मेट्रो लॉऊज हॉटेल मॅनेजर, रा. आगवाली चाळ, लेन नं. 3, गणपती मंदिर बाजुला, घोरपडीगाव) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री १ वाजता मेट्रोचे हॉटेल मॅनेजर मद्रे हे हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होते. यावेळी वरील तिघे पोलिस कर्मचारी हे मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले. त्यांनी येथील बार काऊंटरवर आणखी दारूची मागणी केली. मात्र, तसेच या ठिकानी असलेल्या रोहित काटकर मुलाला त्यांनी मारहाण केली. मॅनेजरने याची माहिती तातडीने
मुंडवा पोलिसांना दिली. या नंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे, आणि उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक आश्विनी भोसले करीत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा