मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Sextortion : ऑनलाइन सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; राजस्थानात जाऊन पुणे पोलिसांची कारवाई

Pune Sextortion : ऑनलाइन सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; राजस्थानात जाऊन पुणे पोलिसांची कारवाई

Nov 22, 2022, 12:17 PM IST

  • Online Sextortion Case in Pune : सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागण्याचा प्रकार राजस्थान मधुन चालत असल्याचे पुढे आले असून पुणे पोलिसांनी या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आरोपीला राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे.

पुणे क्राइम (HT_PRINT)

Online Sextortion Case in Pune : सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागण्याचा प्रकार राजस्थान मधुन चालत असल्याचे पुढे आले असून पुणे पोलिसांनी या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आरोपीला राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे.

  • Online Sextortion Case in Pune : सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागण्याचा प्रकार राजस्थान मधुन चालत असल्याचे पुढे आले असून पुणे पोलिसांनी या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आरोपीला राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे.

पुणे : महाराष्ट्रसह देशभर ऑनलाइन सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागण्याचा प्रकार सध्या वाढलेला आहे. पुण्यात याच प्रकारातून एका तरुणाने आत्महत्या केली होती. तर आणखी एका मुलाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. देशात अशा प्रकारे गुन्हे करणारी ही यंत्रणा राजस्थानमधून चालत असल्याचे पुढे आले असून पुणे पोलिसांनी या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आरोपीला राजस्थानमध्ये जाऊन अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

अन्वर सुबान खान (वय २९, रा. गुरूगोठडी ता. लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य-राजस्थान ) याला दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या सायबर गुन्हे तपास ताब्यात घेतले आहे. दरम्यान या आरोपीला अटक करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पथकावर हल्ला केला. ही संधी साधून आरोपी हा फरार झाला. यावेळी पोलिसांनी आरोपीचा अडीच कि.मी पाठलाग करून, जीवाची पर्व न करता त्याला अटक केली आहे. आरोपीला पाच मोबाईलसह ताब्यात घेतले आहे.

दत्तवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केलेल्या फिर्यादी यांना त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंड वर ' हॅलो ' म्हणून मॅसेज आला व लगेच एक फोटो आला, तो फोटो फिर्यादी यांनी ओपन करून पाहिला असता त्यामध्ये त्यांच्या १९ वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो दिसला. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट होता. तो तक्रारदार यांनी पाठवणाऱ्यांनी तो लगेच डिलीट केला. त्यानंतर फिर्यादीला त्याच्या भावाच्या मैत्रिणीचा फोन आला. तिने त्यांच्या भावाला इन्स्टाग्रामवरून न्युड व्हिडीओ कॉल करून, ब्लॅकमेल करून पैसे मागीतल्याचे सांगितले. यातून त्याने साडेचार हजार रूपये दिले असून ब्लॅकमेलर आणखी पैशाची मागणी करत असल्याचे तिने सांगितले. यामुळे फिर्यादीचा भाऊ रडत असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या भावास फोन केला असता त्याने फोन उचलला नाही त्यामुळे फिर्यादी यास शंका आल्याने ते घरी आले. मात्र, तो पर्यंत त्यांच्या भाऊ याने राहत्या बिल्डींगचे दहव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यांचे फिर्यादीवरून दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला गेला होता.

आरोपीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तपास पथके स्थापन केले होते. सायबर विभागाने अधिक चौकशी करत राजस्थान येथील एका गावातून हे प्रकार होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यात सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनचे प्रशिक्षण घेवून नागरीकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागत असल्याचे तपासात पुढे आले. राजस्थान येथील गुरूगोठडी (ता. लक्ष्मणगढ जि. अलवर) गावात हे प्रकार चालत होते.

या बाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन म्हणाले, अशाप्रकारे सध्या तरूण पीढी ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनला बळी पडून स्वतःचे जीवन संपवित आहे. नागरीकांनी अशा ऑनलाईन सेक्सटॉर्शनला बळी न पडता, भयभीत न होता निसंकोच पोलिसांत तक्रार करावी.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या