मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Sextortion Crime : पुण्यात सेक्सटॉर्शनचा बळी ! न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या

Pune Sextortion Crime : पुण्यात सेक्सटॉर्शनचा बळी ! न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या

Oct 11, 2022, 06:51 PM IST

    • Pune Sextortion Crime : पुण्यात ऑनलाईन झालेल्या ओळखीतून एका तरूणीने खंडणीची मागणी करत ती न दिल्यास न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात धनकवडी येथे एका तरुणाचे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
Pune Sextortion Crime

Pune Sextortion Crime : पुण्यात ऑनलाईन झालेल्या ओळखीतून एका तरूणीने खंडणीची मागणी करत ती न दिल्यास न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात धनकवडी येथे एका तरुणाचे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

    • Pune Sextortion Crime : पुण्यात ऑनलाईन झालेल्या ओळखीतून एका तरूणीने खंडणीची मागणी करत ती न दिल्यास न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात धनकवडी येथे एका तरुणाचे आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पुणे : पुण्यात एका तरुणाला एका समाज मध्यमांवरून एका तरुणीशी ओळख करणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणीने तरुणाला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढत त्याचे नग्न व्हिडिओ काढत त्याला खंडणी मागितली. यामुळे बदनामीच्या भीतीने या तरुणाने घाबरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

अमोल राजू गायकवाड (वय २२, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमोलची काही महिन्यांपूर्वी समाज मध्यमांवर एका अनोळखी तरूणीशी ओळख झाली होती. दोघांमधील संवाद वाढला. या नंतर त्या तरुणीने त्याला विश्वासात घेत त्याचा न्यूड व्हिडिओ बनवला. या नंतर ही तरुणी अमोलला हा व्हिडिओ समाज मध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्या कडे पैशांची मागणी करून त्याला ब्लॅकमेल करू लागली. सुरुवातीला अमोलने तिला ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये पाठविले. त्यानंतर तरुणीने त्याला धमकावने सुरूच ठेवले आणि सातत्याने पैशांशी मागणी करू लागली. तिच्या या ब्लॅकमेलिंग कंटाळून त्याने ‘मैं सुसाईड कर रहा हूँ’, असा मेसेज त्या तरुणीला पाठवला. मात्र, त्या वेळी ‘करो सुसाईड, मैं सोशल मिडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ’, अशी धमकी देऊन तिने पुन्हा पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोलने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी सायबर गुन्हा अंतर्गत आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर तपास करत आहेत.

या प्रकरणाबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर म्हणाले की, आत्महत्येचा हा प्रकार सेक्स्टार्शन मधून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांना त्यांच्या वॉट्सअपवर अनोळखी व्यक्तींकडून पैशाच्या हव्यासापोटी मेसेज पाठविले जातात. अशा मेसजला तुम्ही प्रतिसाद देऊ नका. खंडणीसाठी असे प्रकार घडत असून त्यापासून वेळीच सावध रहा, तसे काही झाल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या