मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Apr 30, 2024, 12:27 PM IST

    • Amravati Crime: अमरावतीत जागेच्या वादातून शेजाऱ्याने आई आणि मुलाची कोयत्याने हत्या केली. या हल्ल्यात वडील थोडक्यात बचावले आहे. आरोपी हत्येनंतर फरार झाले आहे.
अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Amravati Crime: अमरावतीत जागेच्या वादातून शेजाऱ्याने आई आणि मुलाची कोयत्याने हत्या केली. या हल्ल्यात वडील थोडक्यात बचावले आहे. आरोपी हत्येनंतर फरार झाले आहे.

    • Amravati Crime: अमरावतीत जागेच्या वादातून शेजाऱ्याने आई आणि मुलाची कोयत्याने हत्या केली. या हल्ल्यात वडील थोडक्यात बचावले आहे. आरोपी हत्येनंतर फरार झाले आहे.

Amravati mangaldham double murder : अमरावतीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने आई आणि मुलाची भरदिवसा कोयत्याने हत्या केली. आरोपीने शेजाऱ्यावर देखील कोयत्याने हल्ला केला असून या घटनेत संबंधित व्यक्ति हा थोडक्यात बचावला आहे. हत्या केल्यावर आरोपी हा पत्नी मूलासह दुचाकीवरून फरार झाला आहे. ही घटना सोमवारी शहरातील मंगलधाम येथील बालाजी नगर येथे घडली. आरोपी जेव्हा शेजऱ्याला मारत होता तेव्हा परिसरातील नागरिक हा सर्व प्रकार पाहत होते. मात्र, कुणाचीही बोलण्याची हिंम्मत झाली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

कुंदा देशमुख (वय ६५), सुरज देशमुख (वय २५) अशी हत्या झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर वडिल विजय देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. तर देवानंद लोणारे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा करून आरोपीला अटक करण्यासाठी पथक पाठवले आहे.

Ravindra Waikar : बीएमसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजीनगर येथे देशमुख कुटुंब अनेक वर्षांपासून राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश व लहान मुलगा सुरज असे सर्व जण घरात राहत होते. सुरज हा अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला होता. सोमवारी त्याला सुट्टी असल्याने सर्व जण घरीच होते. आरोपी देवानंद लोणारे याने देशमुख यांच्या घरामोर घर खरेदी केले होते. त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत कचरा टाकन्यावरून दोघांमध्ये वाद होता.

Pune :नवीन मोटार घेतल्यानंतर दर्शन घेऊन निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; लोणीकंद- थेऊर रस्त्यावर ट्रक मोटारीचा भीषण अपघात

भर दिवसा हत्या केल्याने खळबळ

दरम्यान, सोमवारी देशमुख कुटुंबीय हे घरी होते. लोणारे याने रिकाम्या जागेवरून देशमुख यांना मोठ मोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बाहेर सुरू असलेल्या गोंधळाचा आवाज ऐकून कुंदा देशमुख या घरा बाहेर आल्या. यावेळी लोणारे याने कुंदा यांना पाहिले. त्याचा राग अनावर झाल्याने लोणारे घरात जात त्याने कोयता आणून कुंदा देशमुख यांच्या डोक्यात वार केले. हा वार वर्मी बसल्याने कुंदा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आई कुंदा यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सुरज बाहेर आला. यावेळी लोणारे याने त्यांचा डोक्यावर देखील वार केले. दरम्यान, मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख त्यांना वाचवण्यासाठी बाहेर धावले असता लोणारे याने त्यांच्यावर देखली वार केले. भांडणाच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती. यामुळे लोणरे याने पुन्हा कुंदा आणि सुरजवर ववार केले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी लोणारे हा जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात पत्नी व मुलाला दुचाकीवर घेऊन फरार झाला.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रेजरपुरा पोलीस पुढील तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या