मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 30, 2024 11:43 AM IST

Nashik Mumbai Agra highway accident: नाशिक येथे भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा मार्गावर राउड घाटात एसटी बस आणि ट्रकची धडक होऊन १० प्रवासी ठार झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बस अर्धी कापली गेली आहे.

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली
नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

Nashik Mumbai Agra highway accident: नाशिक येथे मुंबई आग्रा मार्गावरील राउड घाटात आज सकाळी १०च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने बस ट्रकला धडकली असून या अपघातात १० जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बसचे अर्ध्यातून दोन तुकडे झाले आहेत. सध्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात नाशिक जिल्ह्यातील चांदवड जववलीन राऊड घाटात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी देखील बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Pune :नवीन मोटार घेतल्यानंतर दर्शन घेऊन निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; लोणीकंद- थेऊर रस्त्यावर ट्रक मोटारीचा भीषण अपघात

बसचा टायर फुटल्याने झाला अपघात

प्राथमिक माहितीनुसार हा अपघात बसचा टायर फुटल्याने झाला असल्याची माहिती आहे. राहुड घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहे. आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. बसचा टायर फुटल्याने बस ही समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे ६ प्रवासी जागीच ठार झाले. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काही प्रवाशांचा जागीच मृत्यू

आग्रा महामार्गावर झालेल्या एसटी व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ प्रवासी जागीच ठार झाले. पोलिस आणि स्थानिक नागरिक घटणास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहेत.

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

बस अर्थी कापली गेली

ही बस जळगाव वरून नाशिकला जात होती. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राउड घाटात एसटीचा टायर फुटल्याने बस थेट समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बस ही अर्धी कापली गेली. अपघात स्थळावारील दृश भयावह आणि अंगावर काटा आणणारे होते.

महामार्गावर वाहतूक कोंडी

अपघातानंतर महामार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point