मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Navale Bridge Accident: नवले पूल अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा

Pune Navale Bridge Accident: नवले पूल अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा

Nov 21, 2022, 12:56 PM IST

    • Pune Navale Bridge Accident : पुण्यात काल रात्री एका कंटेनर चालकाने भरधाव वाहन चालवत तब्बल २४ वाहनांना उडवले. या अपघातात १२ नागरिक जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेलल्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नवले पूलावारील अपघातप्रकरणी कंटेनरचालकावर गुन्हा

Pune Navale Bridge Accident : पुण्यात काल रात्री एका कंटेनर चालकाने भरधाव वाहन चालवत तब्बल २४ वाहनांना उडवले. या अपघातात १२ नागरिक जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेलल्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Pune Navale Bridge Accident : पुण्यात काल रात्री एका कंटेनर चालकाने भरधाव वाहन चालवत तब्बल २४ वाहनांना उडवले. या अपघातात १२ नागरिक जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेलल्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात रविवारी रात्री ९ च्या सुमारास झालेल्या अपघातात भरधाव कंटेनरने २४ वाहनांना उडवले. या अपघातात तब्बल १२ जण जखमी झाले.  अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या अपघाताची चौकशीचे आदेश त्यांनी  दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल फरार! तपास पथक शोधात

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. यादव याने त्याच्या ताब्यातील कंटेनर हा हयगय करत वाहतूक नियमांची पायमल्ली करून चालवत अपघातास कारणीभूत ठरला.  अपघातातील जखमींना मदत न करता अपघात स्थळावरून पळून गेला. यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ९ च्या सुमारास खेडशिवापुर बोगद्यातून भरधाव वेगाने हा कंटेनर आला.  कंटेनर हा नवले पुलावर आला असता, चालकाचे कंटेनरवरील  नियंत्रण सुटले.  यामुळे कंटेनरने रस्त्यावरील तब्बल २४ वाहनांना ठोकरले. यात १२ जण जखमी झाले.  सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही.

या अपघातात राहुल भाऊराव जाधव (रा.वारजे), शुभम विलास डांबळे, तुषार बाळासाहेब जाधव, आनंद गोपाळ चव्हाण (रा. सहयोग नगर, पुणे), राजेंद्र देवराम दाभाडे (रा. माणिकबाग पुणे), साहू जुनेल (रा. कोंढवा पुणे), ऑस्कर लोबो (रा. कोंढवा पुणे), मधुरा संतोष कारखानीस (वय ४२, रा. वनाज), चित्रांक संतोष कारखानीस (वय ८), तनीषा संतोष कारखानीस (वय १६), विदुला राहुल उतेकर (वय ४५.) अनघा अजित पभुले (वय ५१, रा. वडगाव पुणे), अनिता अरुण चौधरी (वय ५४, रा. राहटणी चौक) अशी जखमींची नावे आहेत.

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल; चौकशीचे दिले आदेश

पुणे येथे नवले ब्रिजवर रविवारी रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या