मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PCMC Bandh : राज्यपालांविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये बंदची हाक; भाजपच्या अडचणी वाढल्या

PCMC Bandh : राज्यपालांविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये बंदची हाक; भाजपच्या अडचणी वाढल्या

Dec 04, 2022, 12:18 PM IST

    • PCMC Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे.
Pimpri Chinchwad Bandh (HT)

PCMC Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे.

    • PCMC Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे.

Pimpri Chinchwad Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात राजकीय वादंग पेटलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्यापालांविरोधात औरंगाबाद बंदची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये येच्या आठ डिसेंबरला बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत बंदची हाक दिली आहे. विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता भाजप आणि राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारं वक्तव्य केल्यानंतर राज्यातील अनेक भागांमधून त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्याचे संकेत दिले होते. याशिवाय भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता राज्याची उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी बंद पुकारला आहे. येत्या आठ डिसेंबरला शहरात बंद पाळून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला जाणार आहे.

दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चानं औरंगाबादेत सहकारमंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं आहे. यावेळी राज्यापालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून त्याची हकालपट्टी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.