मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

May 07, 2024, 06:32 AM IST

    • Maharashtra Weather Update : राज्यात सोमवारी बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढलेले होते. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पारा हा ४३ पर्यंत पोहचला असून आज उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. degrees Celsius.
विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात सोमवारी बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढलेले होते. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पारा हा ४३ पर्यंत पोहचला असून आज उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. degrees Celsius.

    • Maharashtra Weather Update : राज्यात सोमवारी बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढलेले होते. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात पारा हा ४३ पर्यंत पोहचला असून आज उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. degrees Celsius.

Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भ मारठवड्यातील काही जिल्ह्यातील तापमान हे ४३ अंशांच्याही पुढे गेले आहे. हवामान विभागाने विदर्भात १० तारखे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेष करून विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर नांदेड, लातूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट, वादळी वारे आणि पाऊस होण्याचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

MI Vs SRH : वानखेडेवर सूर्यकुमार यादवच्या शतकाचे वादळ... पॅट कमिन्सच्या हैदराबादचा ७ विकेट्सनी धुव्वा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही पूर्व विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आज हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे व दहा मे रोजी जळगाव, सोलापूर, अहमदनगर, पुणे येथे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मराठवाड्यात ६ व ७ तारखेला नांदेड व लातूर येथे मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आजपासून १० मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर तसेच वर्धा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आज पासून १० मे पर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर सात तारखेला चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ येथे व आठ तारखेला वर्धा व नागपूर येथे तुरळक ठिकाणी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात आज व उद्या आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस दुपारी किंवा संध्याकाळी आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

विदर्भ तापला तापमान ४३ डिग्री सेल्सिअस पार

राज्यात विदर्भात बहुतांश जिल्ह्यात मोठ्या तापमानची नोंद झाली. अकोला येथे ४३.७ डिग्री सेल्सिअस, अमरावती येथे ४३.२ डिग्री सेल्सिअस, बुलढाणा येथे ३९.५ डिग्री सेल्सिअस, ब्रम्हपुरी येथे ४४.१ डिग्री सेल्सिअस, चंद्रपुर येथे ४३.६ डिग्री सेल्सिअस, गोंदिया येथे ४१.४डिग्री सेल्सिअस, नागपुर येथे ४३.५ डिग्री सेल्सिअस, वाशिम येथे ४३.४ डिग्री सेल्सिअस, वर्धा येथे ४३.५ डिग्री सेल्सिअस तर यवतमाळ येथे ४२.० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान

राज्यात सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमान ४४.१ डिग्री सेल्सिअस ऐवढे नोंदवले गेले. तर उस्मानाबाद येथे ४२.७, संभाजीनगर येथे ४१.२, परभणी येथे ४२.६, नांदेड येथे ४२.६ तर बीड येथे ४३.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या