Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या-mumbai news nair hospital staffer dies after jumping off 15th floor of building ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

May 06, 2024 11:24 PM IST

Nair Hospital Mumbai : मुंबईतील नायर रुग्णालयातील (nair hospital) कर्मचाऱ्याने इमारतीच्या १५ मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या (file Pic)
नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या (file Pic)

मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयातील (nair hospital)कर्मचाऱ्याने इमारतीच्या १५ मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. इमारतीवरून उडी मारल्यानंतर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रोहित किशोर गुरबानी (वय ३३वर्ष),असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे आहे. मृत तरुण नायर रुग्णालयात रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणून कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार रोहित २०२५ पासून नायर रुग्णालयात कामाला होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहित इमारतीच्या टेरेसवर गेला व त्याने खाली उडी मारली. त्याला तत्काळ रुग्णालयात नेले गेले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. रोहितने १५ मजली इमारतीच्या छतावरून उडी मारलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल गुरबानी याच्यावर मागील ७ ते ८ वर्षापासून सिझोफेनिया या आजारावर उपचार सुरू होते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी देखील त्याची नेमणूक करण्यात आली होती. मात्र सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास टोपाज या उंच इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येने नायर रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त कण्यात येत आहे.

राहुलने इमारतीवरून उडी मारल्यानंतर गंभीर अवस्थेत त्यालानायर रुग्णालयात आणण्यात आले.रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या आत्महत्या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.दरम्यान,रोहितने आत्महत्या का केली,हे अद्यापसमजलेले नाही.

बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न -

पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने भर पोलीस चौकीत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याचा आरोप या तरुणाने केले असून यातून नैराश्य आल्याचे सांगत त्याने हे पाऊल उचलले. या घटनेमुळे पोलिसांची मात्र, धावपळ उडाली.

Whats_app_banner