मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Crime News : टिव्ही बंद केल्याच्या रागातून सुनेनं सासूची बोटं छाटली, पतीलाही मारहाण

Thane Crime News : टिव्ही बंद केल्याच्या रागातून सुनेनं सासूची बोटं छाटली, पतीलाही मारहाण

Sep 08, 2022, 03:50 PM IST

    • Maharashtra Crime News : टिव्ही बंद केल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुनेनं सासूच्या हाताची बोटं छाटल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Ambarnath thane crime news marathi (HT_PRINT)

Maharashtra Crime News : टिव्ही बंद केल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुनेनं सासूच्या हाताची बोटं छाटल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

    • Maharashtra Crime News : टिव्ही बंद केल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुनेनं सासूच्या हाताची बोटं छाटल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Ambarnath thane crime news marathi : अनेकदा क्षुल्लक कारणावरून मारहाण किंवा बाचाबाची झाल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. परंतु टीव्ही बंद केल्याच्या रागातून सुनेनं थेट सासूवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील अंबरनाथमधून समोर आली आहे. त्यामुळं परिसरात खळबळ उडाली असून आता या प्रकरणात पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Onion Export: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील एका घरात सून टीव्ही पाहत होती. त्यावेळी तिची सासून पूजा करत होती. देवाचं भजन गात असताना तिला टीव्हीच्या आवाजाचा त्रास होत होता. त्यावेळी सासूनं सूनेला आवाज देऊन टीव्ही बंद करायला सांगितला. परंतु सूनेनं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सासूनं स्वत:हून टीव्ही बंद केला.

त्याचा सूनेला प्रचंड राग आला. त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ होऊन वादावादी झाली. त्यानंतर रागावलेल्या सूनेनं सासूवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून तिचे तीन बोटं छाटली असून मध्यस्ती करायला आलेल्या पतीच्याही थोबाडीत लगावली. त्यानंतर नातेवाईकांनी सासूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणात आता जखमी सासूनं ठाण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये सूनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा