Sex Racket In PCMC: पुण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; स्पा मालकासह तिघांना अटक, पाच तरुणींची सुटका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sex Racket In PCMC: पुण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; स्पा मालकासह तिघांना अटक, पाच तरुणींची सुटका

Sex Racket In PCMC: पुण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; स्पा मालकासह तिघांना अटक, पाच तरुणींची सुटका

Sep 08, 2022 01:32 PM IST

Sex racket in pimpri chinchwad : पुण्यातील कॅसल स्पा मध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत स्पा मालकाला अटक केली आहे.

<p><strong>Sex racket in pimple saudagar pune</strong></p>
<p><strong>Sex racket in pimple saudagar pune</strong></p> (HT)

Sex racket in pimple saudagar pune : काही दिवसांपूर्वीच पुण्यातील विमाननगरमध्ये सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा मारत अनेक मुलींची सुटका केली होती. ती घटना ताजी असताना आता पुन्हा शहरातील पिंपळे सौदागरमध्ये एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. काही लोकांकडून कॅसल स्पा मध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कॅसल स्पा च्या मालकासह दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पिंपळे सौदागरमधील जगताप डेअरीजवळ असलेल्या कॅसल स्पा मध्ये आर्थिक फायद्यासाठी सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याच एका कर्मचाऱ्याला तिथं ग्राहक म्हणून पाठवलं, त्यानंतर तिथं वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकत स्पा मालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. याशिवाय पाच तरुणींचीही पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुलींची फसवणूक करून आणण्यात आलं होतं...

पोलिसांनी केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींना फसवून या व्यवसायात आणण्यात आलं होतं. याशिवाय स्पा मालकानं स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्पा सोबतच सेक्स रॅकेटही चालवायला सुरुवात केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर