IT Raids In Mumbai : आयटी विभागाची चक्क झोपडपट्टीवर धाड; घोटाळ्याचे धागेदोरे भिकाऱ्यांपर्यंत?
IT Raids In Mumbai : पॉलिटकल फंडिंग प्रकरणात आज आयकर विभागानं मुंबईतील विविध भागांत छापेमारी केली आहे.
IT Raids Slums Eria In Mumbai : अवैधरित्या कोट्यवधी रुपयांची फंडिंग प्रकरणात आज आयकर विभागानं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत छापेमारी केली आहे. शहरातील सायन आणि बोरिवलीत ही छापासत्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आता या धाडसत्राबाबात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण आता आयटी विभागानं मुंबईतील एका झोपडपट्टीत शंभर कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी धाड टाकली आहे. त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली असून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे धागेदोरे थेट झोपडपट्ट्यांपर्यंत पोहचल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
देशातील पहिलीच घटना...
राजकीय फंडिंगच्या नावाखाली करचोरी होत असल्याचं लक्षात येताच आयकर विभागानं सायनमधील एक झोपडपट्टीवर छापा मारला आहे. मुंबईतील एखाद्या झोपडपट्टीत आयटी विभागानं छापा टाकण्याची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणात थेट झोपडपट्टींमध्ये छापेमारी झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या झोपडपट्टीत एका राजकीय पक्षाचं कार्यालय असून तो राजकीय पक्ष नोंदणीकृत आहे. परंतु त्याला अद्याप निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली नाही.
शंभर स्क्वेअर फुटांची झोपडी आणि मिळाला कोट्यवधींचा निधी...
सायनमध्ये छापेमारी करण्यात आलेली झोपडपट्टी ही दहा बाय दहा आकाराची आहे. तिथं राहणाऱ्या अत्यंत गरिब व्यक्तीला शंभर कोटींचा निधी मिळालेला आहे. परंतु चौकशी अधिकाऱ्यांनी त्या झोपडीत राहणाऱ्या भिकाऱ्याला याबाबत विचारलं असता तो म्हणाला की, मला याबाबत काहीही माहिती नाही, काही लोक माझ्याकडे येत असतात. त्यांनी मला अध्यक्ष केलंय. यात प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून पार्टीचं फंडिंग आणि इतर कामं अहमदाबादच्या ऑडिटरकडून केलं जात असल्याची धक्कादायक माहिती त्यानं आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.