मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Antilia Bomb Scare : अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणाचा एनआयएनं सखोल तपास केला नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

Antilia Bomb Scare : अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणाचा एनआयएनं सखोल तपास केला नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

Jan 24, 2023, 08:29 AM IST

    • Mansukh Hiren Case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सखोल तपास केला नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
Bombay High Court

Mansukh Hiren Case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सखोल तपास केला नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

    • Mansukh Hiren Case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सखोल तपास केला नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया येथे जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करत असतांना काही दिवसांनी मानसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि सचिन वझे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला होता. हा तपास एनआयए देखील करत होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने, या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनआयएला फटकारले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्डात भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि आरएन लड्डा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी ताशेरे ओढत म्हटले आहे की, २४ /२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत एका बड्या उद्योजकाच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. याप्रकरणी एनआयएने जो तपास केला आहे तो समाधानकारक नाही. हा मोठा कट असून तो नियोजनाशिवाय शक्य नाही. यात अनेक जण गुंतले असल्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सोबत कोण होत. स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या. या कटामागे कोण आहे? या प्रकरणी एनआयएने तपास केला असूनही या प्रकरणी एनआयएचे अधिकारी मौन बाळगून आहेत, असे खंडपीठाने म्हटले आहे. हा मोठा कट सचिन वाझे एकट्याने रचणे शक्य नाही. त्याला कुणाची साथ आहे? या चा सखोल तपास एनआयने केला नाही असे देखील कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, अँटिलिया प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयानं सोमवारी फेटाळला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा