मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime : नागपाडा हादरले! प्रेमप्रकरण घरी सांगण्याची धमकी देत मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

Mumbai Crime : नागपाडा हादरले! प्रेमप्रकरण घरी सांगण्याची धमकी देत मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2023 07:18 AM IST

Mumbai Crime : नागपाडा येथे शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फसणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनिवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime (HT_PRINT)

मुंबई : मुंबईतील नागपाडा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रेम प्रकरण घरी सांगण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची लजीवरवाणी घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापकाने मुलीला केबिनमध्ये बोलावून हे कृत्य केल्याची माहिती पीडितेने दिली. या प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुख्याध्यापक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार ही घटना गेल्या डिसेंबर महिन्यात घडली. आरोपी मुख्याध्यापकाने या पूर्वीही पीडित मुलीचा दोनवेळा विनयभंग केला आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या महितीनुसार पहिली घटना डिसेंबरमध्ये घडली. मुख्याध्यापकाने पीडित मुलीला तिचे शाळेतील एका मुलाशी असलेल्या अफेअरबद्दल धमकावले. या बाबत तिच्या पालकांना सांगण्याची तिला धमकी त्याने दिली. आरोपी मुख्याध्यापकाने तिला त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये बोलावले, याठिकाणी त्याने मुलीवर अत्याचार केले.

तर दुसरी घटना ही शनिवारी घडली. या घटनेमुळे मुलीच्या मनावर परिणाम झाला. यामुळे तीच्या वागण्यात बदल झाल्याने पालकांनी तिची आणि तिच्या मित्रांना विचारपूस केली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या घटनेमुळे पालकही हादरले. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली.

ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक शाळा आहे. ती एका एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालवली जाते, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर आरोपी मुख्याध्यापक हा फरार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

काही आठवड्यांपूर्वी देखील ८ जानेवारी रोजी नागपाडा पोलिसांनी एका १५ वर्षीय मुलाला नागरी शाळेच्या आवारात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर काही दिवसांत ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग