Dhule Accident: धुळ्यात भीषण अपघात ! मध्यप्रदेशकडे जाताना टायर फुटून क्रूझर पलटी, तर भरधाव वाहन तापी नदीत कोसळले
Dhule Accident : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी नदी पुलावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका क्रूझरचा टायर फुटल्याने ती उलटली असून तिच्या मागून येणारे भरधाव वाहन थेट तापी नदीत कोसळले आहे.
धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर रात्रीच्या वेळी भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने भरधाव क्रूझर पलटी झाली असून तिच्या मागून येणारे भरधाव वाहन थेट तापी नदी पत्रात कोसळले आहे. ही दोन्ही वाहने मध्यप्रदेशकडे जात होते. या अपघात ५ मजूर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नदीत कोसळलेल्या वाहनाची अद्याप माहिती नाही. त्यात किती जण होते हे देखील कळू शकले नाही.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या महितीनुसार वैजापुर येथून एक क्रूझर (MP 09 FA 6487) वाहन हे काही मजुरांना घेऊन मध्यप्रदेश राज्यातील शेंधवाकडे जात होते. यावेळी हे वाहन मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर आली असता अचानक क्रुझरचा टायर फुटला. अचानक टायर फुटल्याने क्रूझर चालकाचे गडीवरील नियंत्रन बिघडले. त्यामुळे हे वाहन नदीच्या पूलावरच पलटी झाले.
या अपघातात ५ मजूर हे जखमी झाले. यावेळी पाठीमागून एक मोठे अवजड वाहन येत होते. अचानक समोर गाडी पलटी झाल्याने या चालकाचे देखील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नदीचे कठडे तोडून हे वाहन थेट तापी नदीत कोसळले. हे वाहन नेमके कोणते होते, त्यात किती जण होते. या बाबत माहिती मिळू शकली नाही.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमी मजुरांना येथील शिरपूर जवळील एका खासगी दवाखान्यात भरती केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, पुलावर अंधार असल्याने नदीत कोसळलेले वाहन शोधण्यास अडचणी आल्या. नदी पात्रात कुठले वाहन कोसळले याचा शोध पोलिस घेत आहेत.