मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP: तर त्यांनी शिवसेना फोडली नसती; राष्ट्रवादीचा घणाघात

NCP: तर त्यांनी शिवसेना फोडली नसती; राष्ट्रवादीचा घणाघात

Aug 11, 2022, 06:13 PM IST

    • NCP Slams Eknath Shinde Camp: एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतलं. 
Eknath Shinde Camp

NCP Slams Eknath Shinde Camp: एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतलं.

    • NCP Slams Eknath Shinde Camp: एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतलं. 

NCP Slams Eknath Shinde Camp: 'एकीकडं शिवसेनेत बंड करायचं आणि दुसरीकडं आमची आस्था बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे असं दाखवायचं. पण यात आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे. खरंच आस्था असती तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ शिंदे गटावर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला. शिंदे गटातील ९ मंत्र्यांनी नव्या सरकारमध्ये शपथ घेतली. या नवनियुक्त मंत्र्यांनी आज दादर इथं जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर आहे. परंतु ज्या लोकांनी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केली आहे, ते आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन घेतील असा विचार करणंच चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही, ते डॉ. बाबासाहेबांचा काय आदर करणार आहेत, असा खोचक टोलाही महेश तपासे यांनी हाणला आहे. 

'शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली परंतु कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असणार आहे याची स्पष्टता दिसत नाही. शिंदे गटावर भाजपचा दबाव असल्यानं शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती देऊन भाजप आपल्याकडं वजनदार खाती ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं शिंदे गटात सध्या चढाओढ सुरू असून एकवाक्यता नसल्यानं हे सरकार अधिवेशनाला कसं सामोरं जाणार हा खरा प्रश्न आहे, असंही महेश तपासे म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा