मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nawab Malik: नबाब मलिकांचा मुलगा- सुनेला मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Nawab Malik: नबाब मलिकांचा मुलगा- सुनेला मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Jan 26, 2023, 09:20 AM IST

  • Faraz Malik and Laura Hamelin: बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री नबाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक आणि सून लॉरा हेमेलिन यांना जामीन मंजून केली आहे.

Nawab Malik Faraz Malik

Faraz Malik and Laura Hamelin: बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री नबाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक आणि सून लॉरा हेमेलिन यांना जामीन मंजून केली आहे.

  • Faraz Malik and Laura Hamelin: बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री नबाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक आणि सून लॉरा हेमेलिन यांना जामीन मंजून केली आहे.

Marriage Certificate Forgery Case: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक आणि सून उर्फ आयशा मलिक यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केली आहे. पर्यटक व्हिसाचे दीर्घकालीन व्हिसामध्ये रूपांतर करण्यासाठी कथित बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

फराज मलिक आणि त्याची दुसरी पत्नी लॉरा हेमेलिन यांच्याविरोधात गेल्या आठवड्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाखाली कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनीची मागणी केली. आम्ही कोणतेही बनावट कागदपत्रे किंवा फसवणूक केली नाही, असा दावा फराज आणि त्याच्या पत्नीकडून करण्यात आला. याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी मलिक दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

हेमेलिन हिने पर्यटक व्हिसाचे दीर्घकालीन व्हिसामध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज करताना बनावट कागदपत्रे सादर केली, असा आरोप फराज आणि त्याच्या पत्नीवर करण्यात आला होता. या दोघांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी विवाह प्रमाणपत्र बनवून देणारा दलाल विजय कुमार याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दलालाने आपल्यासह आणि १८ जणांची फसवणूक केल्याचा दावाही दोघांनी केला.

सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, दलाल विजय कुमार रायला विविध प्रमाणपत्रे देण्यासाठी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के वापरल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि तो सध्या जामिनावर बाहेर आहे. अर्जदारांनी (फराज मलिक आणि त्यांची पत्नी आयशा) जे काही विवाह प्रमाणपत्र मिळवले आहेत, ते विजय कुमारकडून बनवण्यात आले. यामुळे फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या गुन्ह्यात अर्जदारांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, असं सत्र न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे फराज आणि त्याच्या पत्नीला अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा