मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : तीन महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : तीन महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2023 09:24 PM IST

Devendra fadnavis on teachers recruitment : राज्यात येत्या तीन महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

Devendra fadnavis on teachers recruitment: येत्या तीन महिन्यात राज्यात ३० हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले की, २०१२ पासून शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद होती. तेव्हापासूनची रिक्त पदे नव्या शैक्षणिक सत्रापूर्वी भरली जातील.

देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यापूर्वी केली होती. मात्र अजूनपर्यंत एकही पदभरतीची जाहिरात काढण्यात आलेली नाही. मात्र अशातच आता फडणवीसांनी ३० हजार शिक्षकांच्या भरती करण्याची घोषणा केली आहे.

फडणवीस म्हणाले की, सर्वच जिल्ह्याकडून वाढीव मागण्या आल्या आहेत. मात्र आचारसंहिता असल्यामुळे सर्वच मागण्या मान्य करणे किंवा नव्या घोषणा करणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली. यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यानंतर तत्काळ ७५ हजारपदांच्या नोकर भरतीची घोषणा केली होती. मात्र, अजूनपर्यंत कुठलीच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे ७५ हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात जर भरती प्रक्रिया सुरु झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे. त्यानंतर नुकतीच राज्यसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्रात एकूण रिक्तपदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. मात्र भरती प्रक्रिया ठप्प असल्याने याविरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरु केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या