मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

May 05, 2024, 07:14 AM IST

    • Maharashtra Weather update : राज्यात तापमान वाढीसह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! पावसाचा यलो अलर्ट; ‘येथे’ उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather update : राज्यात तापमान वाढीसह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    • Maharashtra Weather update : राज्यात तापमान वाढीसह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज व उद्या कोकणात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ मराठवड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Raj Thackeray : नारायण राणेंच्या प्रचार सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, विचारला थेट सवाल

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या थरात वाऱ्याची एक चक्रीय स्थिती मराठवाडा व लगतचच्या भागावर आहे. आज व उद्या कोकणात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ६ व ७ मे रोजी मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये एका दोन ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने वाहण्याची शक्यता आहे. यामुले या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिव मध्ये ६, ७ व ८ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६,७, ८ मे रोजी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ मध्ये तर ८ मे रोजी भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनांसह विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना तिन्ही दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

पुण्यात असे असेल हवामान

पुणे व लगतच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात थोडी घट झाली आहे. पुण्याचे तापमान शनिवारी ३९.६ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

राज्यात अकोला सर्वाधिक हॉट

विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात १ ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. राज्यात शनिवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली. येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली. अमरावतीत ४३, मालेगावमध्ये ४२, बुलढाणा, ब्रम्हपूरित ४० आणि ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या