Terrorists attack on Indian air force Convoy : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायु सेना (आयएएफ) च्या एक वाहनावर तसेच सुरक्षा दलांच्या ताफ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाच सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.
दरम्यान, जखमींपैकी एक जवान शहीद झाल्याचे वृत्त असून अन्य एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. चार जवानांवर उधमपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत
एका बसमधून हवाई दलाचे जवान जात होते. तेव्हा हा हल्ला झाला आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच हा हल्ला झाल्याने देशातील सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. सीमारेषेवरील पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली आहे.स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे.
हल्ल्यानंतर वाहने हवाई तळाची वाहने शाहसीतारजवळील भागात सुरक्षित करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत.
हा हल्ला पुंछमधील सुरणकोट गावात झाला. या घटनेत हवाई दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जखमी जवानांना पुढील उपचारासाठी पंजाबमधील उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सांगितले जात आहे की, जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उधमपूरमधील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एअरफोर्सच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये एअरफोर्सच्या वाहनांवर गोळीबाराचे निशाण स्पष्ट दिसत आहेत.
सूत्रांनी सांगितले की, बंदूकधारी दहशतवाद्यांनी सरकारी स्कूलजवळ एमईएस आणि आयएएफ वाहनांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ही घटना अनंतनाग-राजौरी-पुंछ लोकसभा मतदारसंघात घडली आहे. येथे निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख २५ मे ठरवली आहे.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एक दहशतवादी अड्डा उध्वस्त केला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. बांदीपोरा पोलिसांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करून सांगितले की, ''भारतीय लष्कर-१३ आरआर, बांदीपोरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तिसऱ्या बटालियन द्वारे चालवल्या गेलेल्या एका संयुक्त अभियानात उत्तर काश्मीर जिल्ह्यातील चंगाली जंगल अरगाममध्ये एक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आला आहे. या तळावरून एके सीरीजची एक रायफल, चार मॅगझीन सह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.