Parbhani Honour Killing : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ऑनर किलिंगच्या (Honour Killing) घटनेने परभणी जिल्हा हादरला आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमविवाह करण्याचा निश्चय केला होता. या लग्नाला मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता. यातूनच त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केली. ही घटना परभणी जिल्ह्यातील (Parbhani crime news) पालम तालुक्यातील नाव्हा या गावात घडली आहे.
मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होते. याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र याची पर्वा न करता तिने त्याच मुलासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मुलीने इतर जातीतील मुलावर प्रेम करून लग्न करण्याचा निर्धार केल्याने तिच्या आई-वडिलांनी तिची हत्या केली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोजक्या नातेवाईकांना बोलावून तिचे अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मात्र हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर हत्या, पुरावा नष्ट करणे आदि कलमांन्वये पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाव्हा गावातील १९ वर्षीय तरुणीचे गावातीलच अन्य जातीतील तरुणावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, म्हणून पालकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यातूनच २१ एप्रिलच्या रात्री आईवडिलांनी तिची हत्या केली.
हत्येनंतर आरोपी आईवडिलांनी अत्यंत थंड डोक्याने त्याच रात्री कोणालाही ही गोष्ट समजू न देता भावकीतील मोजक्या लोकांना सोबत घेत तरुणीच्या मृतदेह गावातील स्मशानभूमीत नेऊन जाळला व पुरावा नष्ट केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने भर पोलीस चौकीत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याचा आरोप या तरुणाने केले असून यातून नैराश्य आल्याचे सांगत त्याने हे पाऊल उचलले. या घटनेमुळे पोलिसांची मात्र, धावपळ उडाली.