मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले..

25 January 2023, 23:32 ISTShrikant Ashok Londhe

Vba Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत मोठे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-वंचितची आघाडी झाल्यामुळे वंचित महाविकास आघाडीत सामील होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केल्याने जितेंद्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

बुधवारी पुणे दौऱ्यावर असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. आंबेडकर म्हणाले की, आगामी निवडणुकीत  शिवसेना आणि वंचित एकत्र लढले आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू शकतो

महाविकास आघाडीचा भाग होण्याची आमची मुळीच इच्छा नाही. आमची युती शिवसेनेशी (ठाकरे गट) आहे. जागा वाटपावरून  आमच्यामध्ये उद्धव  ठाकरेंशी चर्चा  झाली आहे,  असं  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबतयुतीकेली. त्यानंतर  आज त्यांनी हे विधान  केल्याने आगामी निवडणुकीत भीमशक्ती आणि शिवशक्ती महाविकास आघाडीचा भाग असणार की नाही, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे.