मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sex Racket In Nagpur : नागपुरात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; पोलिसांची लॉजवर धाड, विदेशी तरुणींना अटक

Sex Racket In Nagpur : नागपुरात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; पोलिसांची लॉजवर धाड, विदेशी तरुणींना अटक

Sep 22, 2022, 10:18 AM IST

    • Sex Racket In Nagpur : नागपूरात भरदिवसा सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खेट हॉटेलवर धाड टाकून दोन विदेशी तरुणींना ताब्यात घेतलं आहे.
Sex Racket In Nagpur (HT)

Sex Racket In Nagpur : नागपूरात भरदिवसा सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खेट हॉटेलवर धाड टाकून दोन विदेशी तरुणींना ताब्यात घेतलं आहे.

    • Sex Racket In Nagpur : नागपूरात भरदिवसा सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खेट हॉटेलवर धाड टाकून दोन विदेशी तरुणींना ताब्यात घेतलं आहे.

Sex Racket In Nagpur : काही दिवसांपूर्वी पुण्यातील दोन ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून रेक्स रॅकेट उघडकीस आणल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्यानं खळबळ उडाली आहे. याशिवाय दोन विदेशी तरुणींना ताब्यात घेऊन रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याशिवाय यासाठी विदेशातून काही मुलींना आणण्यात आल्याचीही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं संबंधित हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी तिथं देहव्यापार सुरू असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही विदेशी मुलींसह एका आरोपीला अटक केली आहे.

या दोन्ही तरुणी उझबेकीस्तानच्या असून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात आलेल्या आहेत. त्यांच्यामार्फत गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरात सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. आरोपींनी या मुलींच्या माध्यमातून दिल्ली, पुणे आणि मुंबईत देह व्यापार चालवला होता. त्यानंतर त्यांना नागपूरात आणण्यात आलं होतं. दोन्ही तरुणींचा भारतीय व्हिजा २०१९ मध्येच संपलेला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

पोलिसांना आंतरराष्ट्रीय टोळीचा संशय...

या प्रकरणामागे पोलिसांना आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय आहे. कारण या दोन्ही विदेशी तरुणींचा व्हिजा तीन वर्षांपूर्वीच संपलेला असून उझबेकीस्तानातून आणखी तरुणी आणण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळं आता पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरू केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा