मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Murder Case : दोन लाखांचं बक्षीस असलेल्या फरार आरोपीला अटक, NIA ला मोठं यश

Amravati Murder Case : दोन लाखांचं बक्षीस असलेल्या फरार आरोपीला अटक, NIA ला मोठं यश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 21, 2022 10:48 PM IST

AmravatiMurder Case : एनआयएनेअमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील फरार आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने मुख्य सुत्रधारासह १० आरोपींना अटक केली आहे.

उमेश कोल्हे
उमेश कोल्हे

मुंबई -अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( umesh kohle killing case ) राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA )मोठं यश आले आहे. एनआयएने या प्रकरणातील फरार आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने मुख्य सुत्रधारासह १० आरोपींना अटक केली आहे. तपास संस्थेने अकराव्या फरार आरोपीच्या अटकेसाठी त्याची माहिती देणाऱ्यास २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. त्याला उद्या न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

२१जून रोजी अमरावती (Amravati Murder Case) येथील मेडिकल व्यावसायिक विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. शहिम अहमद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान शेखला अटक केली होती. तर शहिम अहमद हा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता. फरार शहिम अहमदबाबत माहिती देण्याऱ्याला'एनआयए'ने बक्षीस जाहीर केले होते. शहिमला मुंबईतूनअटक केली आहे. शहिमला अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची२१जून २०२२ रोजी रात्रीसाडे दहा वाजण्याच्या सुमारासउमेशआपले मेडिकल दुकानबंद करून दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळीउमेश यांचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी हे त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवरूनधरी निघाले होते. उमेश यांची बाईक शहरातील महिला महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच मागून दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी उमेशला रस्त्यातच अडवले. दुचाकीवरून उतरलेल्या तरुणाने उमेश यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या उमेश यांना त्यांचा मुलगा संकेतने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग