मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena vs BJP : ‘कानाखाली नाही मारायची मग काय यांची...’, नितेश राणेंची ठाकरेंवर खोचक टीका
nitesh rane vs uddhav thackeray
nitesh rane vs uddhav thackeray (HT)

Shiv Sena vs BJP : ‘कानाखाली नाही मारायची मग काय यांची...’, नितेश राणेंची ठाकरेंवर खोचक टीका

22 September 2022, 9:07 ISTAtik Sikandar Shaikh

Shiv Sena vs BJP : काल मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता नितेश राणेंनी एक व्हिडिओ शेयर करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

nitesh rane vs uddhav thackeray : काल शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला, त्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिदे गटावर जोरदार टीका केली आहे. परंतु त्यांनी शिवजयंती एक मे ला असल्याचा उल्लेख केला होता. आता त्यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ शेयर करत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. याशिवाय त्यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये वैयक्तिक पातळीवर टीका केल्यानं यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा तो व्हिडिओ शेयर करत यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची?, असा सवाल केला आहे. याशिवाय त्यांनी या ट्विटमध्ये ठाकरेंवर वैयक्तिक टीका देखील केली आहे. त्यामुळं आता यावरून शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

काल मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प, पक्षातील बंड, मुंबईतील राजकारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शहरातील पूरस्थिती, कोरोना महामारीतील राजकारण अशा अनेक विषयांवरून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे. याशिवाय दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच घेणार असल्याचं त्यांनी भाषणात सांगितलं.