मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gutam Adani : गौतम अदानींना धक्का; जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत घसरण, मस्क अग्रस्थानी कायम

Gutam Adani : गौतम अदानींना धक्का; जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत घसरण, मस्क अग्रस्थानी कायम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 22, 2022 09:34 AM IST

Gutam Adani : काही दिवसांपूर्वीच उद्योजक गौतम अदानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आले होते.

Gautam adani net worth
Gautam adani net worth (HT)

Gautam adani net worth : अदानी ग्रुपचे चेयरमन आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानींचं नाव काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलं होतं. परंतु आता या यादीत त्यांच्या स्थानात घसरण झाली आहे. कारण आता बर्नार्ड अर्नाल्ट यांनी त्यांना मागे टाकत पुन्हा दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळं अदानींची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. काल अमेरिकेच्या शेयर बाजारात मोठी उलटफेर झाल्यानं अनेक उद्योजकांची संपत्ती कमी झाली आहे.

फोर्ब्सच्या रियल टाइम बिलेनियर इंडेक्सनुसार, शेयर बाजारातील बदलामुळं अदानी समूहानं एकाच दिवसात तब्बल ५.९ अब्ज डॉलरची संपत्ती गमावली. त्यामुळं जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानी आले आहेत. आता त्यांची संपत्ती १५२.४ अब्ज डॉलर झाली आहे. तर बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्तीत २.३ अब्ज डॉलरची वाढ झाल्यानं ते दुसऱ्या स्थानावर आले आहेत.

<p>Gautam adani</p>
Gautam adani (HT)

त्यामुळं आता अदानी समूहासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये अदानी समूहानं बंदरं, विमानतळं, कोळसा आणि वीज अशा अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये गगनभरारी घेतली आहे. त्यामुळं रिलायन्स उद्योगसमूहाला मागे टाकत अदानी उद्योगसमूह देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह झाला आहे. याशिवाय आता गौतम अदानी हे सध्या आशियातील सर्वात श्रीमंत तर जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

IPL_Entry_Point