मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Update: दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिमाण; उशिरानं धावतायेत अनेक लोकल

Mumbai Local Update: दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिमाण; उशिरानं धावतायेत अनेक लोकल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 22, 2022 08:44 AM IST

Mumbai Local Update : दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे. याचा परिणाम मध्य अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर देखील झाला आहे. ऐनवेळी झालेल्या या बिघाडमुळे सर्व सामान्य नागरिकांना सकाळी ऑफिसला जाताना याचा मनस्ताप सहन करावा लागला.

दादर स्थानकात लोकलमध्ये बिघाड, वाहतुकीचा खोळंबा
दादर स्थानकात लोकलमध्ये बिघाड, वाहतुकीचा खोळंबा

मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. आज सकाळी दादर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक लोकलसेवा ही धीम्या गतीने पुढे जात आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तसेच या तांत्रिक बिघाडामुळे अनेक लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्याही रखडल्या आहेत. सकाळी हा बिघाड झाल्यामुळे ऑफिसला निघालेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले.

ट्रेंडिंग न्यूज

दादर येथे झालेल्या बिघाडाबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही ट्वीट करुन माहिती दिली आहे. मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनवर सिग्नल सुरू करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे मेन लाइनवर गाड्या उशिरानं धावत आहेत. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बिघाड दुरुस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच समस्येचे निराकरण केलं जाईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी हा बिघाड शोधुन तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरकांची गैरसोय दूर करण्यासाठी ही धडपड सुरु आहे. पण अद्यापही हा बिघाड दूर करण्यास कर्मचाऱ्याना यश आलेलं नाही. यामुळे अजूनही ही वाहतूक संथ गतीने सुरू आहे. या बिघाडामुळे रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक खोळंबले आहे. अनेक गाड्या लेट झाल्या आहेत. मुंबईसह उपनगरांतीन अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे. हा बिघाड लवकर दुरुस्त झाला नाही तर मध्य रेल्वेची सेवा ही आणखी कोलमडण्याची शक्यता आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग