मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Crime News: नेत्यांच्या ओळखीनं ब्लॅकमेल करत हॉटेलवर जेवायचा; VIP फुकट्याला पोलिसांकडून बेड्या

Nagpur Crime News: नेत्यांच्या ओळखीनं ब्लॅकमेल करत हॉटेलवर जेवायचा; VIP फुकट्याला पोलिसांकडून बेड्या

Oct 12, 2022, 02:55 PM IST

    • Sadar Eria Nagpur Crime News : आरोपीनं फारिसनं मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपालांची ऑडिओ रेकॉर्डिंग लोकांना ऐकवून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती.
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Sadar Eria Nagpur Crime News : आरोपीनं फारिसनं मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपालांची ऑडिओ रेकॉर्डिंग लोकांना ऐकवून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती.

    • Sadar Eria Nagpur Crime News : आरोपीनं फारिसनं मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपालांची ऑडिओ रेकॉर्डिंग लोकांना ऐकवून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती.

Sadar Nagpur City Crime News Marathi : मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपालांसोबत फोनवर झालेलं संभाषण लोकांना ऐकवून ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्यातील प्रसिद्ध नेत्यांशी ओळख असल्याचं सांगत आरोपींना अनेक हॉटेलमध्ये फुकट जेवण आणि दारू पार्टी केली होती. फारिस कादरी असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सदर परिसरात आरोपी फारिसनं काही दिवसांपूर्वी हप्ता वसुली करत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतरपासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. या आरोपीनं कोरोना काळापासून शहरात मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल, बडे अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींची रेकॉर्डिंग लोकांना ऐकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचे प्रकार समोर आले होते. परंतु आता पोलिसांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

फारिस नामचीन गुंड असल्यानं त्याला लोक घाबरायचे...

आरोपी फारिसवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याआधी त्यानं एका सरकारी कर्मचाऱ्यालाही मारहाण केली होती. प्रसिद्ध नेत्यांना फोन करून वादग्रस्त मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केल्याच्या रेकॉर्डिंग तो शहरातील लोकांना ऐकवत असल्यानं लोक त्याला घाबरत होते. त्यामुळं त्याला आणखी गुन्हेगारी कृत्य करायला बळ मिळालं होतं.

हॉटेलमालकांना ब्लॅकमेल करून करायचा फुकटची पार्टी...

आरोपी फारिसनं अनेकदा हॉटेलमालकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून फुकट जेवण करत दारू पार्टी केलेली आहे. त्यामुळं त्याला कंटाळलेले हॉटेल व्यावसायिक सोहनसिंग वाधवा यांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपीची या नेत्यांसोबत संभाषणाची ऑडिओ व्हायरल...

आरोपी फारिसनं कोरोनाकाळात मुख्यमंत्री आणि राज्यपालांसहित खासदार नवनीत राणा आणि माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्यासोबत संभाषण केलेलं आहे. त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंगही त्यानं सोशल मीडियावर शेयर केलेल्या आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा