मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri East Bypoll : ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर करण्यासाठी आयुक्तांवर दबाव; अनिल परबांचा आरोप

Andheri East Bypoll : ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर करण्यासाठी आयुक्तांवर दबाव; अनिल परबांचा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 12, 2022 02:28 PM IST

Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आता शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष पेटला आहे.

Thackeray vs Shinde In Andheri East Bypoll
Thackeray vs Shinde In Andheri East Bypoll (HT)

Thackeray vs Shinde In Andheri East Bypoll : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनांतर येत्या तीन नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नोकरीचा राजीनामा देणं आवश्यक आहे. त्यांनी नोकरीचा राजीनामाही दिलेला आहे. परंतु महापालिका प्रशासनानं अजून राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळं आता यावरून ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

ऋतुजा लटके राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी केला आहे. याशिवाय या प्रकरणात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही परबांनी सांगितलं.

मुंबईत माध्यमांशी बोलताना माजी मंत्री अनिल परब म्हणाले की, ऋतुजा लटकेंनी एक महिन्यापूर्वीच नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी सर्व कागदपत्रं जमा केलेली असून त्याची फाईलही तयार आहे. परंतु त्यांनी चुकीच्या पद्धतीनं राजीनामा दिल्याचं सांगत त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. जर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं राजीनामा दिला होता, तर त्याचवेळी त्यांना याबाबत माहिती का देण्यात आली नाही?, असाही सवाल परबांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके या बीएमसीत लिपीक या पदावर कार्यरत आहेत. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्या ठाकरे गटाकडून उमेदवार असल्यानं त्यांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. परंतु त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. लटके या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा आयुक्तांकडे न जाता विभागीय पातळीवरच मंजूर व्हायला हवा, परंतु महापालिका प्रशासनावर सरकार दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप परबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.

IPL_Entry_Point