मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election : आपलं मत कोणीही गृहित धरू नये, मनसेच्या एकमेव आमदाराचा सस्पेन्स

MLC Election : आपलं मत कोणीही गृहित धरू नये, मनसेच्या एकमेव आमदाराचा सस्पेन्स

Jun 20, 2022, 03:40 PM IST

    • मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. आपले मत कोणीही गृहीत धरु नये, असे राजू पाटील म्हणाले आहेत. मागच्या वेळेस आम्ही राज ठाकरे यांच्या आदेशाने व्यक्ती बघून मतदान केले होते. मात्र यावेळी तसे नसल्याचे राजू पाटील म्हणाले आहेत.
मनसेच्या एकमेव आमदाराचा सस्पेन्स

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. आपले मत कोणीही गृहीत धरु नये, असे राजू पाटील म्हणाले आहेत. मागच्या वेळेस आम्ही राज ठाकरे यांच्या आदेशाने व्यक्ती बघून मतदान केले होते. मात्र यावेळी तसे नसल्याचे राजू पाटील म्हणाले आहेत.

    • मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. आपले मत कोणीही गृहीत धरु नये, असे राजू पाटील म्हणाले आहेत. मागच्या वेळेस आम्ही राज ठाकरे यांच्या आदेशाने व्यक्ती बघून मतदान केले होते. मात्र यावेळी तसे नसल्याचे राजू पाटील म्हणाले आहेत.

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्यानिवडणुकीवेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील चांगलेच चर्चेत आले होते. भाजपने राज ठाकरे यांची मनधरणी केल्यामुळे ते मत भाजपला गेल्याची चर्चा होती. मात्र आज होत असलेल्या विधानपरिषदेच्या मतदानाबाबत (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. आपले मत कोणीही गृहीत धरु नये, असे राजू पाटील म्हणाले आहेत. मागच्या वेळेस आम्ही राज ठाकरे यांच्या आदेशाने व्यक्ती बघून मतदान केले होते. मात्र यावेळी तसे नसल्याचे राजू पाटील म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

राजू पाटील म्हणाले की, लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. एका मताचं किती महत्त्व असतं हे मागे राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिलं असेल. राज साहेबांना रात्री हॉस्पिटलला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला निर्देश दिल्याप्रमाणं मतदान होईल, असं यावेळी राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं मनसेचं मत नेमकं कोणाला याचा सस्पेन्स कायम आहे. हे एकमेव मत खूप महत्वाचे आहे. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होत असे राजू पाटील म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरु राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण १० जागांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी ५ वाजता सुरु होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करुन दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही १९९६, २०१० सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार का याची उत्सुकता दिसून येत आहे.

विधान परिषदेत‘ही’ लढत ठरत आहे लक्षवेधक -

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध भाजपचे प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ४४ आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता२६ मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता ८ मते कमी पडत आहेत. या ८ मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा