मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vidhan Parishad Election: दहावी जागा कोण जिंकणार? ११ उमेदवार रिंगणात

Vidhan Parishad Election: दहावी जागा कोण जिंकणार? ११ उमेदवार रिंगणात

Jun 20, 2022, 08:26 AM IST

    • Maharashtra Vidhan Parishad Election : भाजपची पाचवी जागा आणि काँग्रेसची दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मते नाहीत.
भाजप आमदारांच्या बैठकीत नेत्यांना विजयाचा विश्वास (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Vidhan Parishad Election : भाजपची पाचवी जागा आणि काँग्रेसची दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मते नाहीत.

    • Maharashtra Vidhan Parishad Election : भाजपची पाचवी जागा आणि काँग्रेसची दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मते नाहीत.

राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी आज मतदान होत आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे (BJP) ५ तर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) प्रत्येकी २ उमेदवार आहेत. संख्याबळ पाहता भाजपच्या ४ जागा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. तर भाजपची पाचवी जागा आणि काँग्रेसची दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मते नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

भाजपकडून विधान परिषदेला प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय हे रिंगणात आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी हे दोन उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकार यांना उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे दोन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत.

काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी ८ मतांची गरज आहे तर भाजपला त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी १८ मते आवश्यक आहेत. गुप्त पद्धतीने मतदान असल्यानं मते फुटण्याचा धोका आहे. दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात सामना होणार आहे.

काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की,"राज्यसभेत उलथापालथ झाली, तेव्हा काही चुका झाल्या. आता त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. चमत्कार पुन्हा पुन्हा होत नाहीत. अपक्ष हे कुणाच्या तरी सोबत आहेत. मला खात्री आहे की गेल्या वेळी जे झालं ते होणार नाही."

"भाजप पूर्ण तयार आहे. मतमोजणी सुरू झाली लक्षात येईल की भाजपने किती आत्मविश्वासाने ही निवडणूक लढवली. आम्हाला आमच्या विजयाचा विश्वास आहे. आघाडीचा एक उमेदवार पडेल. कोणत्या पक्षाचा ते मला माहिती नाही.", अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

पुढील बातम्या