मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Maharashtra MLC Polls 2022: मताधिकारासाठी नवाब मलिक, अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात

Maharashtra MLC Polls 2022: मताधिकारासाठी नवाब मलिक, अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात

Jun 20, 2022, 01:01 PM IST

    • Anil Deshmukh and Nawab Malik Moves Supreme Court: विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
Anil Deshmukh - Nawab Malik

Anil Deshmukh and Nawab Malik Moves Supreme Court: विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

    • Anil Deshmukh and Nawab Malik Moves Supreme Court: विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Anil Deshmukh and Nawab Malik Moves Supreme Court: राज्य विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळावा या मागणीसाठी माजी मंत्री अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटकेत आहेत, तर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक तुरुंगात आहेत. हे दोघेही आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी त्यांनी यापूर्वी न्यायालयाकडं मागितली होती. मात्र, त्यांना ती नाकारण्यात आली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत तरी ही संधी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी दोघांनीही सुरुवातीला पीएमएलए कोर्टात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला मतदानाचा हक्क बजावू द्यावा. त्यासाठी संरक्षणात मतदानासाठी विधान भवनात नेले जावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळली होती.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयास दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यांच्या वकिलांनी यावर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळं त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारला जात असल्याबद्दल शिवसेनेनं 'सामना'च्या तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार नाकारणे हा अन्याय आहे. हे भेदाभेदीचं राजकारण आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

पुढील बातम्या