मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MCA च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नीतेश राणे यांनी रोहित पवारांचं अभिनंदन केलं खरं, पण…

MCA च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नीतेश राणे यांनी रोहित पवारांचं अभिनंदन केलं खरं, पण…

Jan 09, 2023, 11:58 AM IST

  • Nitesh Rane taunt Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल आमदार नीतेश राणे यांनी खोचक शब्दांत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Rohit Pawar - Nitesh Rane

Nitesh Rane taunt Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल आमदार नीतेश राणे यांनी खोचक शब्दांत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

  • Nitesh Rane taunt Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल आमदार नीतेश राणे यांनी खोचक शब्दांत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पवार कुटुंबीयांवर नेहमीच टीकेच्या तोफा डागणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी या निवडीबद्दल रोहित पवारांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर रोहित पवारांना बोचरा टोलाही हाणला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

रोहित पवार यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन, पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.’

रोहित पवार यांचे आजोबा अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आजवर क्रीडा क्षेत्रातील अनेक संघटनांचं नेतृत्व केलं आहे. क्रिकेट संघटनांच्या राजकारणात तर त्यांनी थेट आंतररराष्ट्रीय पातळीपर्यंत 'बॅटिंग' केली आहे. त्यांनी बीसीसीआय व आयसीसीचंही अध्यक्षपद भूषवलं आहे. शरद पवार यांच्या कार्यकाळात क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटच्या फॉरमॅटमुळं या खेळाची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली. मागील काही वर्षांपासून मात्र ते क्रिकेट संघटनांपासून दूर होते. आता रोहित पवार यांच्या रूपानं शरद पवार अप्रत्यक्षपणे का होईना पुन्हा मैदानात उतरले आहेत. हाच धागा पकडून नीतेश राणे यांनी रोहित पवार यांना उपरोधिक टोला हाणला आहे.

रोहित पवार यांच्या बरोबरच एमसीएचे उपाध्यक्ष म्हणून किरण सामंत, सचिव म्हणून शुभेंद्र भांडारकर, सह-सचिव म्हणून संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची निवड झाली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा