मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Marathi News 9 January 2023 Live News

Chhagan Bhujbal

Marathi News 9 January 2023 Live: बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा: भुजबळ

Share Market Updates : Chhagan Bhujbal on OBC Census : बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे.

Mon, 09 Jan 202312:22 PM IST

OBC Census : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा - छगन भुजबळ

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र दिले आहे.

Mon, 09 Jan 202312:20 PM IST

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या 'अभिनंदन… अभिनंदन' या पुस्तकाचं प्रकाशन

नील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांच्या 'अभिनंदन... अभिवादन' या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडले. त्यावेळी अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाचे कर्तृत्वाचे कौतुक केले.

Mon, 09 Jan 202309:13 AM IST

Amravati Graduate Constituency :  अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये चुरस

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये चुरस आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच शहरात इच्छुकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. नेता नव्हे, कार्यकर्ता… असं आवाहन इच्छुकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून केलं आहे.

Mon, 09 Jan 202309:11 AM IST

Nashik Shivsena : नाशिकमधील शिवसेना कार्यालयावरून ठाकरे व शिंदे गट आमनेसामने

नाशिकमधील शिवसेना कार्यालयावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत. शिंदे गटानं या कार्यालयावर दावा ठोकला आहे. हे कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर आहे, असं शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं आहे.

Mon, 09 Jan 202306:52 AM IST

बुद्धभूमी गडचांदूर येथील सम्राट अशोककालीन बुद्धविहार आणि लेणींचे संरक्षण आणि संवर्धन करणार - रामदास आठवले

महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवरील गडचांदूर येथे सम्राट अशोककालीन  शंभरहून अधिक बुद्धविहारांचे अवशेष सापडले असून लेणीही आहेत. या प्राचीन बुद्धभूमी गडचांदूरला दरवर्षी ८ जानेवारीला विदर्भातील हजारो बौद्ध भेट देतात. येथील १३७ एकर जमिनीच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी व बुद्धभूमी गडचांदूरच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकारी आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन रिपब्लिकन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं. बुद्धभूमी गडचांदूर इथं धम्मध्वज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

Mon, 09 Jan 202304:56 AM IST

Share Market Updates : शेअर बाजाराची उसळी, सेन्सेक्स झेपावला!

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जबरदस्त उत्साह दिसत असून सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टी २०० अंकांनी वाढला आहे. बँक निफ्टी तब्बल ३२५ अंकांनी वाढला आहे.

Mon, 09 Jan 202304:43 AM IST

सेन्सेक्सची उसळी, निफ्टी १८ हजार पार

शेअर बाजार झपाट्याने वाढत आहे. सकाळी ९.४५ वाजता सेन्सेक्समध्ये ५६५ अंकांची वाढ होऊन तो ६०४६५ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीने १८००० चा टप्पा ओलांडला आहे. आयटी निर्देशांकात २.२८ टक्क्यांची वाढ झाली आहे. टीसीएस २.७५ टक्क्यांनी वाढला आहे. आज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करेल. पेटीएम ३.३ टक्क्यांनी वाढला आहे. तो ५७१ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. खरं तर, पेटीएम पेमेंट्स बँकेने दिग्गज बँकर सुरिंदर चावला यांची व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. आरबीआयने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. तत्पूर्वी आज आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीच्या वातावरणाचा फायदा भारतीय बाजाराला झाला आहे.

Mon, 09 Jan 202304:02 AM IST

Nitesh Rane : एमसीएच्या अध्यक्षपदावरून नीतेश राणे यांचा रोहित पवारांना टोला

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन, पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया, असा बोचरा टोला आमदार नीतेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांना हाणला आहे.

Mon, 09 Jan 202312:49 AM IST

अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा

आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल ५०  वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन ३  ते ११  जानेवारी दरम्यान पार पडतय.  

Mon, 09 Jan 202312:48 AM IST

आजपासून न्यायालयांमध्ये ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात

सर्वच न्यायालयांमध्ये आजपासून ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होईल.  

Mon, 09 Jan 202312:48 AM IST

पुणे बनावट प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर करणार

१२ लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना सीबीएसईची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळीचा पर्दाफाश नुकताच झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करत असून या प्रकरणी चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत.

Mon, 09 Jan 202312:43 AM IST

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमाणे त्यांना दिलासा मिळेल का या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.