मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

May 04, 2024, 01:43 PM IST

    • Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली- मेहकर मार्गावर आज भीषण अपघात झाला. एसटी बस व एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली- मेहकर मार्गावर आज भीषण अपघात झाला. एसटी बस व एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    • Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली- मेहकर मार्गावर आज भीषण अपघात झाला. एसटी बस व एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. येथील चिखली-मेहकर मार्गावर हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली एसटी बस व एका खाजगी बसची जोरदार धडक झाली असून या अपघात एक महिला ठार झाली आहे तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. तब्बल ४४ प्रवासी हे बसमधून प्रवास करत होते. जखमी पैकी ६ प्रवाश्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

या अपघात मृत्यूमुखी आणि जखमी प्रवाशांचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार हा अपघात ओवरटेक करण्याच्या नादात झाला. वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. या अपघातात खाजगी बसने एसटी बसला मागून धडक दिली. यात दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

ही बस अहमदपूर येथून ४४ प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी ही बस चिखली ते मेहकर मार्गावरील नांद्री फाट्या जवळ आली असताना, मागून येणाऱ्या शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बस ने एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या ट्रॅव्हल्सचा वेग जास्त असल्याने एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोही ट्रॅव्हल्स ही सुरतवरून मेहकरला जात होती. या बसमध्ये स्लीपर कोच असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवाशीही किरकोळ जखमी झाले आहेत.

तर एसटी बस मधील एक महिला प्रवासी आणि २५ प्रवासी हे जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी नागरिकांना बाहेर काढले. तर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर ते देखील अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलिस पुढील तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या