मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar : राजकारणानंतर रोहित पवार आता क्रिकेटच्या मैदानात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

Rohit Pawar : राजकारणानंतर रोहित पवार आता क्रिकेटच्या मैदानात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 08, 2023 07:15 PM IST

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची  निवड
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड

मुंबई : आधी जिल्हा परिषद मग आमदारकी तर आता थेट क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवार दिसणार आहे. रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करून या बाबत माहिती दिली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवार ट्विट मध्ये म्हणाले, आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे मार्गदर्शन, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, तसंच mca च्या अनेक अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मला मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज आणि सह सचिव संतोष बोबडे यांचेहीअभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता #MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे म्हणत त्यांनी आभार देखील मानले आहे.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग