मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldana: बुलढाण्यात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Buldana: बुलढाण्यात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Feb 27, 2023, 11:09 AM IST

  • Buldana Shocking: बुलढाण्यातील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime

Buldana Shocking: बुलढाण्यातील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Buldana Shocking: बुलढाण्यातील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldana Crime: बुलढाणाच्या कोलबड येथून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना उघडकीस आली आहे. राजीव गांधी मिलिटरी स्कूलमधील एका शिक्षकाने दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

धर्मेंद्र उत्तम हिवाळे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये विज्ञान शिकवतो. या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी आरोपीविरोधात अनैसर्गिक अत्याचार केल्याची बुलढाणा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सदर शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेनंतर पालक वर्गांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी शिक्षकाने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकाला ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा