मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: घराबाहेर खेळायला गेलेली चिमुकली अचानक झाली गायब; सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीसही चक्रावले

Mumbai: घराबाहेर खेळायला गेलेली चिमुकली अचानक झाली गायब; सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीसही चक्रावले

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 27, 2023 09:47 AM IST

Mumbai Kidnapping: मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातून गायब झालेल्या पाच वर्षाच्या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

Mumbai Police
Mumbai Police

Mumbai Crime: मुंबईच्या कांदिवली पूर्व येथे रविवारी सायंकाळी पाच वर्षाची चिमुकली खेळता खेळता गायब झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घराबाहेर खेळायला गेलेली मुलगी लवकर घरी न परतल्याने तिच्या पालकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, मुलगी कुठेच सापडत नसल्याने नातेवाईकांनी समता नगर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलीचे अपहरण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब उपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि अवघ्या अडीच तासात मुलीला शोधून घेतला. याप्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,या मुलीचे ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील जॉगर्स पार्क परिसरातून रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी रात्री ८.३० वाजता समता नगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यात दोन अज्ञात व्यक्ती मुलीचे अपहरण करून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसानी वेळ न घालवता त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, स्थानिक रिक्षावाले यांनीही मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना सहकार्य केले.

दरम्यान, काजू पाडा येथे दोन अज्ञात व्यक्ती मुलीला घेऊन जात असताना नागरिकांनी त्याला ओळखले. त्याला हटकल्यानंतर त्या मुलीला टाकून तो तिथून पळून गेला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोलिसांनी रात्री साडे अकरा वाजता मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले. या घटनेनंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point