मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve : प्रकाश सुर्वेंच्या मुलाने फेसबुकवरील व्हिडिओ डिलीट का केला?, अंबादास दानवेंचा सवाल

Ambadas Danve : प्रकाश सुर्वेंच्या मुलाने फेसबुकवरील व्हिडिओ डिलीट का केला?, अंबादास दानवेंचा सवाल

Mar 14, 2023, 05:49 PM IST

  • Ambadas Danve Live : प्रकाश सुर्वे यांच्या मुलानं फेसबुकवरील व्हिडिओ डिलीट का केला?, असा सवाल करत त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

Ambadas Danve On Sheetal Mhatre Viral Video Case (HT)

Ambadas Danve Live : प्रकाश सुर्वे यांच्या मुलानं फेसबुकवरील व्हिडिओ डिलीट का केला?, असा सवाल करत त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

  • Ambadas Danve Live : प्रकाश सुर्वे यांच्या मुलानं फेसबुकवरील व्हिडिओ डिलीट का केला?, असा सवाल करत त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

Ambadas Danve On Sheetal Mhatre Viral Video Case : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटलेलं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. त्यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीचाही समावेश आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यातच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रकाश सुर्वे यांच्या मुलानं फेसबुकवरील तो व्हिडिओ डिलीट का केला?, असा सवाल करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

विधानपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, शीतल म्हात्रेंचा व्हिडिओ माझ्याकडेही आला होता, मी सुद्धा १० लोकांना पाठवला. युट्यूबवर ३० लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. आमदारांचा प्रकार ३२ देशांमध्ये पाहिला गेला आणि पोलीस विनाकारण दुसऱ्याच लोकांवर कारवाई करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या फेसबुक पेजचा तपास पोलिसांनी करायला हवा. तो व्हिडिओ ओरिजनल आहे की मॉर्फ केलाय, त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात विदर्भातील एका आमदारावर कारवाई करण्यात आली. आता एका आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याची तपासणी झाली पाहिजे. तो व्हिडिओ ओरिजनल असेल किंवा नाही, परंतु आमदार सुर्वेंच्या मुलाच्या फेसबुक पेजवरून तो व्हिडिओ डिलीट का करण्यात आला?, असा सवाल उपस्थित करत अंबादास दानवेंनी शिंदे गटाला धारेवर धरलं आहे.

शीतल म्हात्रेंचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?- सुषमा अंधारे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती दिसत आहे. परंतु सगळीकडे शीतल म्हात्रे याच बाजू मांडत आहेत. प्रकाश सुर्वे फ्रेममध्ये कुठेही नाही. एकाच व्यक्तीची ठरवून बदनामी केली जात असून शीतल म्हात्रेंचा ओरिजनल व्हिडिओ कुठे आहे?, असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.