मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Dhangekar : कसब्यातील विजयानंतर काँग्रेस सोडणार का?, रविंद्र धंगेकर म्हणाले...

Ravindra Dhangekar : कसब्यातील विजयानंतर काँग्रेस सोडणार का?, रविंद्र धंगेकर म्हणाले...

Mar 05, 2023, 05:09 PM IST

    • Ravindra Dhangekar Interview : कसब्यातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी पक्षांतराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Ravindra Dhangekar Kasba Peth Pune (HT)

Ravindra Dhangekar Interview : कसब्यातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी पक्षांतराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

    • Ravindra Dhangekar Interview : कसब्यातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी पक्षांतराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Ravindra Dhangekar Kasba Peth Pune : कसब्यातील राजकीय हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेसनं कसब्यात भाजपचा पराभव केला असून त्यात रविंद्र धंगेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याच्या चर्चा आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. याशिवाय पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका मुलाखतीत धंगेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, असं वक्तव्य केल्यामुळं आता ते पक्षांतर करणार का?, असा सवाल उपस्थित होत असतानाच रविंद्र धंगेकर यांनी स्वत:च याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी कसब्यात विजय मिळवलेला असला तरीही काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा सर्वसमावेशक पक्ष आहे. जेव्हा मी लहान होतो, त्यावेळी मी शिवसेनेसोबत काम केलं. शिवसेना आणि मनसेत असताना मला मानसन्मान मिळाला. परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षानं उमेदवारी देत जो विश्वास दाखवला, त्यासाठी काँग्रेसचे आभारच मानायला हवेत, असं म्हणत आमदार रविंद्र धंगेकर यांनी पक्षांतराच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ दत्तक घेतला होता. त्यांनी मला निवडून आणण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. याशिवाय कार्यकर्त्यावर कसं प्रेम करायचं हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शिकायला हवं, असंही आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.