मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

Apr 27, 2024, 12:46 PM IST

    • Karoli Ghat Bus Accident News: जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी बस दरीत कोसळली.
जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात सकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

Karoli Ghat Bus Accident News: जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी बस दरीत कोसळली.

    • Karoli Ghat Bus Accident News: जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी बस दरीत कोसळली.

Bus Falls Into Ravine In Karoli Ghat: इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणारी खाजगी बस १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. ही घटना जळगाव जामोद- बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस २८- ३० प्रवाशांना घेऊन इंदूरहून अकोल्याकडे जात होती. मात्र, जळगाव जामोद- बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटातून येत असताना बस १०० फुट दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात २८ जण जखमी झाले. जखमींना मध्यप्रदेशच्या दर्यापूर आणि बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Nanded Man Damages EVM: नांदेडमध्ये मतदारानं कुऱ्हाडीनं ईव्हीएम मशीन फोडलं, रामतीर्थ येथील मतदानकेंद्रावरील प्रकार

मुंबई : ईस्टर्न फ्रीवेवर ट्रक उलटला

यापूर्वी शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ईस्टर्न फ्रीवेवर ट्रक उलटल्याची घटना घडली. ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. वाहन चालकाने वेळीच ट्रकमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच वडाळा वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे ईस्टर्न फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ईस्टर्न फ्रीवेवर ट्रक आणि दुचाकीला परवानगी नसतानाही ते मुक्तपणे फिरत असल्याचे आरोप केला जात आहे.

सांगली: कारची ट्रॅव्हल्स बसला धडक; ५ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

सांगली जिल्ह्यातील जांभुळवाडी परिसरात गेल्या आठवड्यात क्रुझर कारने खासगी ट्रॅव्हल्स बसला मागून धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी झाले. ही टक्कर इतकी भीषण होती की क्रूझरचा पुढचा भाग निखळला. कर्नाटकातील बागलकोट येथील जमखंडी येथील लोक सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे लग्नासाठी येत होते. त्याचवेळी जांभुळवाडी गावाजवळ क्रुझरने प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा