मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

May 08, 2024, 04:44 PM IST

    • Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली.

Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.

    • Election Commission of India: केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.

Maharashtra legislative council elections: संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रासह देशात मंगळवारी (७ मे २०२४) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. कोणत्या दिवशी मतदान होणार? तसेच अर्ज करण्याची आणि अर्ज मागे घेण्याची तारीख जाणून घेऊ.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Sharad Pawar : आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील; शरद पवारांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर तर नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या चारही जागांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२४ असेल. तर, उमेदवार २७ मे २०२४ पर्यंत अर्ज मागे घेऊ शकतात. १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. तसेच निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया १८ जूनपर्यंत पूर्ण केली जाईल.

Loksabha Poll : मतदानाची टक्केवारी घसरली! तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला हक्क; राज्यात इतके टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच ठिकाणी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर तिसऱ्या टप्प्यात ७ मे २०२४ रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदान झाले.

चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात कुठे मतदान?

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे चौथ्या टप्प्यात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात २० मे २०२४ रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात मतदान होईल.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या