मराठी बातम्या  /  निवडणुका  /  मोठी बातमी..! ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी, सुट्टीवर आलेल्या सैनिकाला अटक

मोठी बातमी..! ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी, सुट्टीवर आलेल्या सैनिकाला अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 07, 2024 08:28 PM IST

Ambadas Danve Evm Hacker : ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक केली आहे.

ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी
ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी

Chhatrapati Sambhajinagar  : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ईव्हीएम हॅक (EVM Hacker ) करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भारतीय सैन्य दलात नोकरीला असल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. 

गेल्या अनेक वर्षापासून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. ईव्हीएम हॅक करून त्यातील डेटाशी छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा करत विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. याचदरम्यान ईव्हीएम हॅक करून हवा तसा निकाल लावून देण्यासाठी हॅकरने अंबादास दानवे यांना फोन करत अडीच कोटी रुपयांची मागणी केली. दानवेंना फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणारा व्यक्ती हा सैन्य दलात सध्या तो सुट्टीवर आला आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. दानवेंना त्याने आपली ओळख मेजर अशी करून दिली होती. ढाकणेला एक लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मारुती ढाकणे हा जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. 

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जितके ईव्हीएम आहेत ते सर्व हॅक करुन तुम्हाला पाहिजे तसा निकाल लावून देण्याचे आश्वासन त्याने अंबादास दानवेंना फोन केला. यासाठी त्याने अडीच कोटींची मागणी केली होती. याबाबत दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील गोल्डन हॉटेलमधून मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले. 

 मिळालेल्या माहितीनुसार मारुती ढाकणे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असून तो लष्करी जवान असून सध्या सुटीवर आला आहे.  मागील ५ ते ६ महिन्यांपासून तो अंबादास दानवे यांना सातत्याने फोन करून मी इलेक्शन मॅनेजमेंट करतो, मला काम द्या अशी गळ घालत होता. दानवे यांनी नेमके कोणते काम करतो असे विचारले असता, 'अडीच कोटी रुपये द्या, मी ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला पाहिजे तसा निकाल लावून देतो' असे सांगितले. 

त्यानंतर दानवेंनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकाराचा पर्दाफास करण्यासाठी त्याला पैसे घेण्यास शहरात बोलावले. मुख्य बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी सापळा रचून ढाकणे यास एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. भामटेगिरी करत त्याने ईव्हीएम हॅक करतो अशी बतावणी केली होती. मुळात त्याला संगणकाचे काहीच ज्ञान नाही. त्याला कर्ज झाल्याने त्याने ही बनवेगिरी केल्याचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे. 

WhatsApp channel