मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indian Navy ALH Crash : नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्र किनारी कोसळले

Indian Navy ALH Crash : नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्र किनारी कोसळले

Mar 08, 2023, 02:37 PM IST

    • Indian Navy ALH Crash near Mumbai : भारतीय नौदलाचे हलके हेलिकॉप्टर मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Indian Navy ALH Crash near Mumbai

Indian Navy ALH Crash near Mumbai : भारतीय नौदलाचे हलके हेलिकॉप्टर मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

    • Indian Navy ALH Crash near Mumbai : भारतीय नौदलाचे हलके हेलिकॉप्टर मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मुंबईः भारतीय नौदलाचे हलके एएलएच हेलिकॉप्टरने आज नेहमी प्रमाणे उड्डाण घेतले असता हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनाऱ्यावर कोसळले आहे. यात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असना किनाऱ्याजवळ अपघात घडला. अपघातानंतर तात्काळ शोधकार्य व बचावकार्य हाती घेण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील तीन कर्मचाऱ्यांना नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. यानंतर हेलिकॉप्टर मधील तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर कसे कोसळले व अपघात कसा झाला याची माहिती समजू शकली नाही. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती वेस्टर्न नेव्हल कमांडच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तिघांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तळ आयएनएस शिक्रा येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिघांची प्रकृती ठीक आहे. वैमानिकाने आपत्कालीन फ्लोटेशन गियर तैनात केले असून ते वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा