मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरूच; धुलिवंदनाच्या दिवशी कोयता दाखवून धमकी, मग गोळीबार, एक जखमी

Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरूच; धुलिवंदनाच्या दिवशी कोयता दाखवून धमकी, मग गोळीबार, एक जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 12:23 PM IST

Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरूच आहे. धूलिवंदनाच्या दिवशी आधी कोयता दाखवून आणि नंतर गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Pune News
Pune News (HT City)

पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम आहे. धूलिवंदनाच्या दिवशी पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे एकाला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक जन जखमी जन जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

Maharashtra Budget Session: विधानसभेत आज स्त्री शक्तीचा जागर; सभागृहात मांडले जाणार महिला धोरण

धुलिवंदनाच्या दिवशी पुण्यातील मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगरमध्ये भर दुपारी एकावर गोळीबार करण्यात आला. यात एक जण जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबत स्थनिक नागरिकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारात गवळी नावाच्या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Fire : पुण्यात मध्यरात्री भीषण आग; फर्निचरचे दुकान भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

या प्रकरणी संतोष वामन कांबळे ( गोळीबार करणारा व्यक्ती ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेत प्रशांत उर्फ पऱ्या गवळी हा जखमी झाला आहे. प्रशांत हा देखील सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केटयार्ड परिसरात जुन्या वादातून मंगळवारी हा हल्ला करण्यात आला. मार्केट यार्ड परिसरात आंबेडकरनगर वसाहतीत प्रशांत उर्फ पऱ्या गवळी हा दुपारच्या सुमारास संतोष कांबळेला मारण्यासाठी कोयता घेऊन आला. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दरम्यान, प्रतिकार करत संतोष कांबळेने प्रशांत गवळी याच्यावर बंदुकीतून तीन राउंड फायर केले. यात प्रशांत गवळी जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Women's Day : पुणे जिल्ह्यात आठ लाख महिला बनल्या संपत्तीच्या मालक; पुणे जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम

प्रशांत गवळी हा दोन दिवसांपूर्वी तडीपरितून मुक्त झाला होता. दरम्यान, परिसरात दहशत माजवण्याच्या हेतूने गवळी हा हातात कोयता घेऊन फिरत होता. दरम्यान, त्याच्या घराजवळील गुन्हेगार संतोष वामन कांबळे याने हत्यार घेऊन का आलास? असे गवळीला हटकले. यावेळी प्रशांत गवळीने संतोष कांबळे याला, 'मी तिकडे असताना माझ्या विषयी पाठीमागे वाईट बोलत होतास,' असे म्हणून हातातील कोयत्याच्या साह्याने प्रशांत गवळी याने संतोष वर हल्ला केला. दरम्यान दोघांमध्ये झटापट झाली. संतोष कांबळेने हातातील कोयता हिसकाऊन घेत प्रशांतला घरी जाण्यास सांगितले.

 

मात्र, प्रशांत पुन्हा त्याच्या घराजवळ आला. यावेळी संतोषने घरात जात गावठी कट्टा आणला. बैल बाजाराशेजारील हातभट्टी दारूच्या धंद्याजवळ त्याने गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. एक गोळी ही प्रशांतला लागल्याने तो जखमी झाला आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त देशमुख, मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे या प्रकरणी तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग