मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Budget Session: विधानसभेत आज स्त्री शक्तीचा जागर; सभागृहात मांडले जाणार महिला धोरण

Maharashtra Budget Session: विधानसभेत आज स्त्री शक्तीचा जागर; सभागृहात मांडले जाणार महिला धोरण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 11:50 AM IST

Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दूसरा आठवडा सुरू होणार आहे. आज महिला दिनानिमत्त सभागृहात महिला धोरण मांडले जाणार आहे. या सोबतच लक्षवेधी सूचना देखील महिला मांडणार आहेत.

Vidhan Bhavan
Vidhan Bhavan

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज पासून सुरुवात होत आहे. आज जगीतक महिलादिन असल्याने आजचे काम काम विशेष ठरणार आहे. आज सभागृहात मांडण्यात येणाऱ्या लक्षवेधी सूचना महिला आमदार मांडणार आहेत. या सोबतच आज महिला धोरण देखील सभागृहात सादर केले जाणार आहे.

विधान सभेचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू असून आज या अधिवेशानात महिला धोरण सादर केले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. या सरकारच्या काळत हे धोरण सभागृहात मांडले जाणार होते. मात्र त्याला विधिमंडळाची मंजुरी मिळण्याच्या आधीच राज्यात सत्तान्तर झाले. यामुळे ही महिला धोरण लांबणीवर पडले होते. दरम्यान, आज जागतिक महिला दिन असल्याने ही धोरण आज पुन्हा सभागृहात सादर केले जाणार आहे.

महिला दिनाच्या दिवशी ही धोरण मंजूर व्हावे या साथी महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा या प्रयत्नशील होत्या. मात्र, या धोरणात काही सुधारणा आणि सुचनांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी काही महिला आमदारांची होती. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी देखील या संदर्भात मागणी केली होती. दरम्यान, सर्व महिला आमदारांची मागणी लक्षात घेऊन या धोरणात काही बदल करण्यात आले. हे धोरण आज सभागृहात मांडले जाणार आहे.

स्त्री-पुरुष जन्मदर समान ठेवण्यासाठी प्रभावी उपाय योजना करणे, महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रागतिक दृष्टिकोन रूजवणे आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे, सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी आणि त्यांना उद्दिष्ट साध्य करता येण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्राधान्य देणे, धर्म, जात, सत्ता, प्रदेश यांमुळे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध स्त्रियांना पाठबळ देणे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे, शासन स्तरावरील निर्णयप्रक्रियेत महिलांच्या हिताचे व हक्कांची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देणारी आधुनिक आणि स्वबळावर उभी असणारी नवी प्रतिमा तयार करणे या सारख्या मुद्यांचा या महिला धोरणात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, आज सभागृहात लक्षवेधीदेखील महिला मांडणार आहेत. आज आठ लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार असून त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे.

IPL_Entry_Point